स्पेशल

Happy Diwali Wishes In Marathi : यंदाच्या दिवाळीला तुमच्या प्रिय व्यक्तीना पाठवा हे संदेश !

Happy Diwali Wishes In Marathi 2023 :- नमस्कार मित्रानो ही दिवाळी आपल्या सर्वांना आनंददायी आणि काहीतरी देणारी ठरावी आणि आपल्या नात्यांचा स्नेह ऋणानुबंध व्हावा म्हणून आम्ही आपल्यासाठी दिपावलीच्या असंख्य शुभेच्छा घेऊन आलो आहोत.आपल्या त्या आवडतील आणि आपण त्या नक्कीच या शुभेच्छा दिवाळीत आपल्या मित्र ,मैत्रिण संगे सोयरे यांना पाठवाल. व यांचा आनंद घ्याल..!!

1
चंद्राचा कंदील घरावरी,
चांदण्यांचे तोरण दारावरी..
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,
दिवाळीचे स्वागत घरोघरी..!!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

2
स्नेहाचा सुगंध दरवळला..
आनंदाचा सण आला..
एकच मागणे दिवाळी सणाला..
सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना..
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!

3
धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा..
शुभ दिवाळी!

4
घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!
दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !

5
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!

6
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,
प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच
मनोकामना…!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

7
जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

8
नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..
सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली..
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली..
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!

9
आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

10
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा,
सरस्वतीपूजा व दीपपूजा,
दिवाळीला उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला..
दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा..!

11
दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
* शुभ दिपावली *

12
धन त्रयोदशी !!
नरक चतुर्दशी !!
लक्ष्मी पूजन !!
बलि प्रतिपदा !!
भाऊबीज !!
आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…
शुभ दीपावली..!

13
उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट..
दिव्यांची आरास, फराळाचे ताट..
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट..
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
शुभ दीपावली..!

14
सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा
या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो..
दीपोत्सवाच्या तेजोमय शुभेच्छा..!

15

एक दिवा लावु जिजाऊचरणी।
एक दिवा लावु शिवचरणी।
एक दिवा लावु शंभुचरणी।
आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा…..
दिपावलीच्या हार्दिक शिवशुभेच्छा….
आपल्या घरि सुख समाधान सदैव
नांदो हिच जगदंबेचरणी प्रार्थना॥
।। जय शिवराय ।।
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेछा !!

16

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

17
सर्व मित्र परिवाराला …
दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…

18
सगळा आनंद सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे,
सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे,
ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…

19

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

20
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…

21

यशाची रोषणाई
कीर्तीचे अभ्यंग स्नान
मनाचे लक्ष्मिपुजन
समृद्धीचे फराळ
प्रेमाची भाऊबीज
अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा

22

यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!!
येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!
दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!

23

फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दिपावली सारख्या मंगल प्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.
शुभ दिपावली!

24

फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दिपावलीचा सण आहे खूपच गोड.
दिपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!

25

फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

26

पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

27

पहीला दिवा आज लागला दारी,
सुखाची किरणे येई घरी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

28

नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी

29

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली!

30

धनत्रयोदिशी पहिला दिवा लागतो दारी,
कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी,
रांगोळी, फटाके आणि फराळाची तर मजाच न्यारी,
चला साजरी करूया दिवाळी आली रे आली…
शुभ दीपावली

31

धन त्रयोदशी !!
नरक चतुर्दशी !!
लक्ष्मी पूजन !!
बलि प्रतिपदा !!
भाऊबीज !!
आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…
शुभ दीपावली !

32

दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

33

दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

34

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख-समृध्दी घेऊन येवो!

35

दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
* शुभ दिपावली *

36

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

37

दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण…

38

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

39

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!

40

उत्कर्षाची वाट उमटली
विरला गर्द कालचा काळोख…
क्षितिजावर पहाट उगवली,
घेऊनिया नवा उत्साह सोबत…
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…

41

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली

42

आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.

43

आनंदाची मुक्तहस्तपणे
उधळण करते ही दिवाळी
आप्तजणांच्या गाठीभेटी
घडवून आणते ही दिवाळी
सर्वाना एकत्र जमवून
प्रेम वाढवते ही दिवाळी
ईवल्या ईवल्या पणत्यांनी
उजळून टाकते ही दिवाळी
सुंदर सुंदर आकाशदिव्यानी
प्रकाशमय करते ही दिवाळी
लहानांसाठी मजाच मजा
घेऊन येते ही दिवाळी
खमंग फराळाचा आस्वाद
घ्यायला देते ही दिवाळी
भेटवस्तू आणि भेटकार्डांची
देवाणघेवाण घडवते ही दिवाळी
अशी सर्वांचा आनंद
द्विगुणीत करते ही दिवाळी
तेव्हा माझ्याकडून सुद्धा सर्वांना
दिपावलीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts