Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडीची चाहूल लागत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांनी थंडीची तीव्रता वाढेल अशी अपेक्षा आहे. हुडहुडी भरवणारी थंडी येत्या काही दिवसांनी येणार असे अपेक्षित असतानाच मात्र महाराष्ट्रातील हवामानात एक मोठा बदल पाहायला मिळाला आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने भारतीय हवामान खात्याकडून संबंधित जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तथापि भारतीय हवामान खात्याने जेव्हा अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा थोडासा पश्चिमेकडे सरकेलं तेव्हा राज्यावरील पावसाचे सावट दूर होईल असेही यावेळी स्पष्ट केले आहे. खरे तर महाराष्ट्रात दिवाळीच्या काळात पाऊस झाला.
मान्सून परतल्यानंतर ही दिवाळीच्या काळात राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी अक्षरशः ढगफुटीसारख्या पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. पण, आता गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान कोरडे असून थंडीची तीव्रता सातत्याने वाढत आहे.
राज्याला नुकतीच गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील गुलाबी थंडी येत्या काही दिवसांनी तीव्र होणार असे हवामान खात्याने नुकतेच जाहीर केले होते.
मात्र ऐन थंडीच्या सुरुवातीलाच राज्यातील हवामानातं बदल झालाय. आज हवामान खात्याने 1-2 नाही तर तब्बल 15 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यता आली आहे.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे आज कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, विदर्भातील बुलढाणा, वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली या भागात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय, राज्यात आज अनेक ठिकाणी ढगाळ वातावऱण राहण्याची शक्यता आहे.
ढगाळ हवामानामुळे राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तापमानात चढ-उतार होईल आणि काही भागांमध्ये थंडीचा जोर थोडासा कमी होईल असेही आयएमडीच्या तज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.