Havaman Andaj 2024 : सध्या भारतात दीपोत्सवाचा मोठा सण साजरा होत आहे. दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातही दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे.
दरम्यान या दिवाळीच्या सणाला वरून राजाची हजेरी पाहायला मिळणार असा अंदाज आता समोर येत आहे. यंदाची दिवाळी ही पावसात साजरी करावी लागणार असे भारतीय हवामान खात्याने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.
खरेतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. मान्सून माघारी फिरल्यानंतर राज्यात पावसाने पुन्हा दणका दिला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
खरीप हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे यामुळे नुकसान झाले आणि रब्बी हंगामातील पेरणीच्या कामांना याचा फटका बसला होता. दरम्यान, आता गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने शेती कामांना वेग आला आहे.
पण भारतीय हवामान खात्याने आजपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिला आहे. आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील जवळपास 21 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. 29, 30 आणि 31 ऑक्टोबरला राज्यातील या संबंधित जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार असा अंदाज आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये जाहीर केला आहे. अर्थातच दीपोत्सवाच्या काळात यंदा पावसाची हजेरी राहणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस?
भारतीय हवामान खात्यात दिलेल्या माहितीनुसार, आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना,
परभणी, हिंगोली, भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच उद्या अर्थातच 30 ऑक्टोबरला अहिल्यानगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने उद्या या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात 31 ऑक्टोबरला देखील पावसाचा अंदाज आहे. 31 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन करताना हवामान खात्याचा हा सुधारित अंदाज डोळ्यापुढे ठेवायला आहे.