Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातून हद्द बाहेर झाला असल्याची घोषणा केल्या काही दिवसांपूर्वी केली. मात्र मान्सून परतल्यानंतर राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. अचानक महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू झाला.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झालाय. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
कांदा समवेतच फळबाग पिकांना या वादळी पावसाचा मोठा फटका बसतोय. दरम्यान भारतीय हवामान खात्याने आगामी काही दिवस राज्यात असाच पाऊस सुरू राहणार असे म्हटले आहे.
आज आणि उद्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 23 ऑक्टोबरला देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याकडून समोर आला आहे.
आज आणि उद्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये बरसणार पाऊस ?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज अर्थातच 21 ऑक्टोबर रोजी राज्यातील मराठवाडा विभागातील काही जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने आज महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उद्या अर्थातच 22 ऑक्टोबरला पालघर मुंबई वगळता संपूर्ण कोकण, खानदेश अर्थात धुळे, नंदुरबार, जळगाव हे तीन जिल्हे वगळता संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील बहुतांशी जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. 23 ऑक्टोबरला देखील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
23 ऑक्टोबरला दक्षिण कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर व आजूबाजूच्या परिसरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या अनुषंगाने या सदर भागाला भारतीय हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. अर्थातच राज्यात आता 23 ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता आहे. 23 ऑक्टोबर नंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर कमी होईल असे म्हटले जात आहे.