Havaman Andaj : ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रात वरूणराजाची हजेरी लागणार असा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार असा अंदाज दिला आहे. पुढील दोन दिवस अर्थातच पाच आणि सहा डिसेंबरला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
आजही राज्यातील मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. खरं तर, गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमधील हवामान चेंज झाले आहे. तापमानात वाढ झाली असून थंडीची तीव्रता कमी झाली आहे.
IMD ने आज बुधवारी राज्यात मध्य महाराष्ट्र व कोकणात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. कोकणातील सिंधूदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या अनुषंगाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं सांगितल्याप्रमाणे, फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावर देखील पाहायला मिळतोय.
सध्या कर्नाटकाच्या सागरी भागासह अरबी समुद्राच्या पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा दाब येत्या दोन दिवसात पुढे सरकणार असे सांगितले जात असून पुढे हा पट्टा हळूहळू कमकुवत होणार आहे.
याचा परिणाम म्हणून कोकणातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. गोव्यात देखील आगामी काही दिवस पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उद्या अर्थातच पाच डिसेंबरला कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. उद्या अर्थातच 6 डिसेंबरला सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमधील घाटमाथ्यावर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या अनुषंगाने या सर्व जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून पाच आणि सहा डिसेंबर रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे या संबंधित भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.