Havaman Andaj : गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. दरम्यान हवामान खात्याने राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार असे भाकीत वर्तवले आहे. पुढील तीन-चार दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
येत्या 24 तासात हा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होईल आणि परिणाम स्वरूप राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढवण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा विभागात जोरदार पावसाचा आणि कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील चार दिवस राज्यात असेच हवामान कायम राहणार आहे. राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यातही पावसाची जरी पाहायला मिळाले.
अहमदनगर मध्ये पावसाचे प्रमाण हे थोडेसे अधिक होते. एवढेच नाही तर हवामान खात्याने अहमदनगर मध्ये आणखी जोरदार पाऊस होणार अशी शक्यता वर्तवली असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान आता आपण भारतीय हवामान खात्याने राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून कोणत्या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आणि कोणत्या जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
कुठे बरसणार मुसळधार पाऊस?
मुंबई सह संपूर्ण कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. या भागात पुढील तीन चार दिवस पावसाची शक्यता आहे.
आय एम डी ने जारी केलेल्या आपल्या नवीन बुलेटिनुसार, कोकणातील पालघर, ठाणे, उत्तर महाराष्ट्र विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पश्चिम महाराष्ट्र विभागातील पुणे, सांगली, सोलापूर, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, विदर्भ विभागातील धाराशीव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ, अकोला या जिह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून त्या अनुषंगाने या सदर जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
तसेच राज्यातील कोकण विभागातील दक्षिणेकडील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र विभागातील कोल्हापूर, सातारा, मराठवाडा विभागातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या सदर जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.