Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे परतीच्या पावसा संदर्भात. खरे तर सध्या महाराष्ट्रात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा परतीचा पाऊस सक्रिय झाला आहे.
काल रात्री राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने हजेरी लावली असून आजही महाराष्ट्रातील जवळपास 25 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर या संबंधीत जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील दिवसाचे कमाल तापमान मोठ्या प्रमाणात वाढले होते.
ऑक्टोबर हिट मुळे राज्यातील अनेक भागांमधील कमाल तापमान हे 36 अंश सेल्सिअस पार गेले होते. पण आता हे कमाल तापमान लक्षणीय कमी झाले आहे.
पावसाळी वातावरणामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान हे कमी झाले आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
मात्र या वादळी पावसाचा खरीप हंगामातील पिकांना तसेच फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. द्राक्ष, डाळिंब सारखे फळपिक यामुळे प्रभावित होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पण या परतीच्या पावसाचा रब्बी हंगामातील पिकांना मोठा फायदा होऊ शकतो. रब्बी हंगामातील गहू हरभरा सारख्या महत्त्वाच्या पिकांना हा पाऊस वरदान सिद्ध होणार आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकणातील दक्षिणेकडील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये म्हणजेच एकूण सहा जिल्ह्यांमध्ये आज विजांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून या सदर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय आज कोकणातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ही पावसाची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना देखील आज येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र या जिल्ह्यांमधील पावसाची तीव्रता ही वर नमूद केलेल्या सहा जिल्ह्यांपेक्षा कमी राहणार असा अंदाज आहे.