स्पेशल

तुम्ही देखील सोलर कृषी पंपासाठी अर्ज केला होता का? ‘अशा पद्धती’ने घरबसल्या ऑनलाईन पहा यादीतील तुमचे नाव

Solar Krushi Pump Benificiary List:- सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना सध्या सुरू असून या माध्यमातून सोलर कृषी पंप तसेच घरगुती विजेची गरज भागवण्यासाठी सौर पॅनल बसवण्याकरिता अशा योजनांच्या माध्यमातून अनुदान दिले जाते.

यामध्ये सौर कृषी पंप हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे असून रात्री बेरात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्याची गरज यामुळे राहणार नाही व त्यामुळे शेतकऱ्यांना निर्माण होणाऱ्या समस्या देखील मिटतील. शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप मिळावेत याकरिता केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार महाकृषी ऊर्जा अभियान- प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर पंपांची योजना सुरू आहे.

या योजनेमध्ये सौर पंप मिळवण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते व आता केंद्र शासनाकडून सोलर कृषी पंप लाभार्थी यादी ऑनलाईन प्राप्त झालेली आहे. त्यामुळे तुम्ही देखील अर्ज केला असेल तर यादीमध्ये तुमचे नाव आले आहे की नाही हे तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने देखील पाहू शकता.

ही पद्धत वापरा आणि सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा
सोलर पंप योजनेची लाभार्थी यादीत तुमचे नाव आले आहे की नाही हे पाहण्याकरिता तुम्हाला सरकारच्या पीएम कुसुम नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय पोर्टलला भेट देणे गरजेचे आहे.या पोर्टलची लिंक ही पुढील प्रमाणे आहे….
https://pmkusum.mnre.gov.in/#/beneficiary-list

1- पीएम कुसुम नवीन आणि नवीकरण या ऊर्जा मंत्रालय पोर्टलच्या या लिंक वर जाऊन पोर्टल ओपन केल्यानंतर आपले राज्य निवडायचे आहे. यामध्ये तुम्हाला MAHARASHTRA-MEDA आणि MAHARASHTRA-MSEDCL असे दोन पर्याय दिसतील व यापैकी तुम्ही कोणत्या प्रकारे अर्ज केला आहे तो पर्याय निवडायचा आहे.

2- त्यानंतर पुढे तुमचा जिल्हा निवडायचा असून किती पंप कॅपॅसिटी एचपी करिता तुम्ही अर्ज केला आहे ते निवडायचे आहे व वर्ष निवडून पुढे गो या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

3- गो ला क्लिक केल्यानंतर पुढे अर्जदाराचे नाव तसेच जिल्हा, गाव व सोलर कोणत्या कंपनीचा मिळालेला आहे त्याचे नाव व इतर सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळते व ही यादी आपण पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड करू शकता.

यादी डाऊनलोड करण्यासाठी वरती असलेल्या पीडीएफ आयकॉन या पर्यायावर क्लिक करून फाईल सेव्ह करू शकता व आपले नाव सोलर पंप योजनेची लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही हे पाहू शकता.

या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी तीन, पाच आणि साडेसात एचपी क्षमतेच्या सौर कृषी पंपांसाठी अर्ज केले होते त्या पात्र लाभार्थ्यांची यादी आता प्रकाशित करण्यात आलेली आहे.

त्यामध्ये शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार तीन, पाच आणि साडेसात एचपी व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती डीसी सौर पंप उपलब्ध होणार व स्वखर्चाने इतर वीज उपकरणे लावता येण्याची सोय यामध्ये असणार आहे.

अधिक माहितीसाठी या ठिकाणी संपर्क साधू शकता
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण( महा ऊर्जा) मुख्यालय-
पत्ता- औंध रोड, पशुसंवर्धन आयुक्तालया शेजारी, स्पायसर कॉलेज समोर,औंध,पुणे-411007
फोन नंबर-020-35000450
ई-मेल आयडी
re@mahaurja.com

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts