HDFC Bank FD News : एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक. ही प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना जबरदस्त परतावा ऑफर करते. जर तुम्हालाही आगामी काळात एचडीएफसी मध्ये फिक्स डिपॉझिट करायची असेल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे.
आज आपण एचडीएफसी बँकेच्या 90 दिवसांच्या फिक्स डिपॉझिट योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुदत ठेव योजनेत महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात.
सुरक्षित गुंतवणुकीसाठी मुदत ठेव योजनेचा पर्याय हा सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा केला जातो. फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवलेले पैसे कधीच वाया जाऊ शकत नाही. यामुळे अनेकजण या ठिकाणी गुंतवणूक करतात.
कशी आहे HDFC बँकेची 90 दिवसांची एफडी योजना ?
एचडीएफसी बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँक 90 दिवसांच्या एफडी योजनेवर अर्थातच तीन महिन्यांच्या एफडी योजनेवर 4.50% एवढे व्याज देते.
महत्त्वाचे म्हणजे एचडीएफसी बँकेकडून याच कालावधीच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 0.50 टक्के एवढे अधिकचे व्याजदर लागू आहेत. म्हणजेच सिनिअर सिटीजन ग्राहकांना 90 दिवसाच्या एफडी योजनेवर 5% दराने व्याज ऑफर केले जात आहे.
आता आपण याच एचडीएफसी बँकेच्या याच 90 दिवसांच्या एफडी योजनेत नऊ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर ग्राहकांना किती रिटर्न मिळणारे संदर्भात माहिती पाहणार आहोत.
खरे तर, अनेकांना अल्पकालावधीसाठी गुंतवणूक करायची असते. त्यांच्यासाठी एचडीएफसी बँकेचा हा पर्याय नक्कीच फायद्याचा ठरणार आहे.
9 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार?
एचडीएफसी बँकेच्या एफडी कॅल्क्युलेटर नुसार, जर सामान्य ग्राहकांनी एचडीएफसी बँकेच्या 90 दिवसांच्या एफडी योजनेत नऊ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटी वर अर्थातच तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नऊ लाख दहा हजार 125 रुपये मिळणार आहेत.
अर्थातच दहा हजार 125 रुपये व्याज म्हणून दिले जाणार आहेत. जर याच कालावधीच्या एफडी योजनेत सीनियर सिटीजन ग्राहकांनी नऊ लाख रुपये गुंतवले तर त्यांना नऊ लाख 11 हजार 250 रुपये मिळणार आहेत अर्थातच सीनियर सिटीजन ग्राहकांना 11 हजार 250 रुपये व्याज म्हणून अतिरिक्त मिळणार आहेत.