HDFC Bank : एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी खाजगी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज ऑफर करते. एचडीएफसी कडून आपल्या ग्राहकांना होम लोन, पर्सनल लोन, गोल्ड लोन, एज्युकेशन लोन, बिझनेस लोन अन एग्रीकल्चर लोन अशा विविध प्रकारचे कर्ज दिले जाते.
दरम्यान आज आपण एचडीएफसी कडून दिल्या जाणाऱ्या पर्सनल लोन ची माहिती पाहणार आहोत. पर्सनल लोन अर्थातच वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित कॅटेगरीमध्ये येते. यामुळे या प्रकाराचे कर्ज हे महाग मिळते.
या कर्जासाठीचे व्याजदर इतर कर्जांच्या तुलनेत नेहमीच अधिक असतात. यामुळे जेव्हा फारच गरज असेल तेव्हाच वैयक्तिक कर्ज घ्यावे अन्यथा अशा प्रकारचे कर्ज घेणे टाळावे असा सल्ला जाणकार लोकांनी दिला आहे.
तथापि जर तुम्हाला पैशांची नितांत आवश्यकता असेल आणि तुम्ही वैयक्तिक कर्ज काढण्याच्या तयारीत असाल तर आजचा हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवा.
कारण की आज आपण एचडीएफसी बँकेकडून जर आठ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागू शकतो याचे कॅल्क्युलेशन समजून घेणार आहोत.
एचडीएफसी बँकेचे वैयक्तिक कर्जासाठीचे व्याजदर
एचडीएफसी बँक पगारदार लोकांना 10.85% ते 24 टक्के दराने वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत आहे. मात्र वैयक्तिक कर्जासाठी एचडीएफसी बँकेकडून प्रोसेसिंग फी देखील वसूल केली जाते. एचडीएफसी बँक वैयक्तिक कर्जासाठी 6500 + GST एवढे शुल्क वसूल करते.
8 लाखांचे वैयक्तिक कर्ज घेतल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार?
एचडीएफसी बँकेने जर एखाद्या ग्राहकाला 10.85% व्याजदराने आठ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज सात वर्षे कालावधीसाठी मंजूर केले तर सदर व्यक्तीला 13635 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच सदर व्यक्तीला 11 लाख 45 हजार 340 रुपये द्यावे लागणार आहेत. म्हणजेच तीन लाख 45 हजार 340 रुपये व्याज म्हणून बँकेला द्यावे लागणार आहेत. सोबतच प्रोसेसिंग फी म्हणून 6500 प्लस जीएसटी देखील द्यावी लागणार आहे.