Health News : प्रत्येक व्यक्तीचा एक विशिष्ट ब्लड ग्रुप असतो. ए, बी, एबी आणि ओ असे मुख्यत: चार प्रकारचे रक्तगट असतात. दरम्यान आज आपण याच चार रक्त गटासंदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. या चार रक्तगटातील व्यक्तींना कोणत्या रोगाचा सर्वाधिक धोका असतो, कोणत्या ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका असतो या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत.
खरंतर सायन्स मध्ये दररोज काही ना काही नवीन शोध लागत असतात. शास्त्रज्ञ दररोज काही ना काही नवीन संशोधन करत असतात. दरम्यान वैद्यकीय तज्ञांनी केलेल्या अशाच एका संशोधनात व्यक्तीच्या ब्लड ग्रुप वरून त्याला कोणत्या रोगाचा सर्वाधिक धोका असतो हे ओळखले जाऊ शकते असा दावा करण्यात आलाय.
अशा परिस्थितीत आज आपण ए, बी, एबी आणि ओ या चार प्रमुख ब्लड ग्रुपच्या लोकांना कोणते आजार होण्याची शक्यता अधिक असते या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
O ब्लड ग्रुप : ज्या व्यक्तींचा ब्लड ग्रुप O असतो अशा लोकांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो असा दावा काही वैद्यकीय तज्ञांनी केला आहे. तज्ञ सांगतात की ओ रक्तगट असणाऱ्या लोकांचे आरोग्य खरंतर खूपच चांगले राहते.
या लोकांना सहसा कोणतेच विकार होत नाहीत. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे या रक्तगटाच्या व्यक्तीला पेपटीक अल्सर आणि रक्ताचे विकार होण्याची शक्यता बळावली आहे.
AB ब्लड ग्रुप : एबी रक्तगट असणाऱ्या लोकांना मेंदूशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. या लोकांची स्मरणशक्ती वयाच्या आधीच कमी होऊ शकते असे काही अभ्यासातून समोर आले आहेत.
B रक्तगट : भारतात डायबिटीस पेशंटची संख्या भारतातील आहे. खरे तर हा रोग कोणत्याही रक्तगटातील लोकांना होऊ शकतो. पण ज्या लोकांचा रक्तगट बी असतो त्या लोकांना हा रोग होण्याची शक्यता अधिक असते असे काही अभ्यासातून समोर आले आहे. या रक्तगटातील लोकांना टाईप टू डायबिटीस होण्याची शक्यता अधिक असते.
ब्लड ग्रुप A : या रक्तगटाच्या लोकांना हृदयविकार, गॅस्ट्रिक कॅन्सर आणि स्मॉलपॉक्स होण्याचा धोका जास्त असतो. जर या लोकांची जीवनशैली बरोबर नसेल, योग्य वेळी जेवण नसेल तर या लोकांवर हे आजार लवकर अटॅक करतात.