स्पेशल

Home Care Tips: पाण्यात ‘ही’ एक छोटीशी गोष्ट टाका आणि त्या पाण्याने घराची फरशी पुसा! घरातील उंदीर कुठे गायब होतील कळणारही नाही

Home Care Tips:- घरांमध्ये उंदरांचा सुळसुळाट होणे ही अनेक दृष्टिकोनातून खूप त्रासदायक अशी गोष्ट आहे. घरामध्ये जर उंदरांचा सुळसुळाट असेल तर घरातील कपडे तसेच धान्याच्या गोण्या वगैरे  कुरतडून प्रचंड प्रमाणात नुकसान करतात. त्यामुळे उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाययोजना केल्या जातात.

उंदीर घालवुन लावण्यासाठी ज्या काही उपाययोजना केल्या जातात त्यामध्ये बऱ्याचदा केमिकलचा वापर केला जातो. अशा प्रकारचे केमिकल एखाद्या वेळेस आरोग्याला धोकादायक होऊ शकते व यामुळे पूर्णपणे उंदीरांचा नायनाट होईल असे देखील दिसून येत नाहीत.

अशाप्रकारे अनेक उपाययोजना करून देखील उंदीरांचा बंदोबस्त होत नाही. या अनुषंगाने जर तुमच्याही घरांमध्ये अशाच प्रकारे उंदरांचा हैदोस  असेल तर तुम्ही अगदी सहजरित्या ताबडतोब उंदरांचा बंदोबस्त करू शकतात.

 पाण्यामध्ये कापूर मिसळून त्या पाण्याने घराचे फरशी पुसल्याने उंदरांचा होतो बंदोबस्त

घरामध्ये झालेल्या उंदरांचा सुळसुळाट कमी करायचा असेल किंवा उंदरांचा बंदोबस्त करायचा असेल तर तुम्ही कापूरच्या मदतीने उंदीरांची समस्या मुळापासून दूर करू शकतात.

कापूरला जो काही वास येतो तो खूप तीव्र स्वरूपाचा असतो व तो वास उद्दीरांना अजिबात सहन होत नाही. त्यामुळे कापूरचा वास आल्यानंतर उंदीर त्या ठिकाणाहून पळ काढतात. उंदीरांना घराच्या बाहेर हाकलून लावण्यासाठी ही एक नैसर्गिक पद्धत असून हा उपाय सुरक्षित आणि स्वस्त देखील आहे.

 कापूरचा वापर कसा कराल?

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात अगोदर पाण्यामध्ये कापून टाकावा. साधारणपणे एका बादली पाण्यात तुम्ही कपूरचे चार ते पाच तुकडे टाकू शकतात. त्यानंतर ह्या पाण्याने संपूर्ण घर पुसून टाकावे.

घरामध्ये ज्या ठिकाणी उंदीरांचा वावर जास्त दिसून येतो त्या ठिकाणी व्यवस्थित पाण्याने पुसून टाकावे तसेच स्वयंपाक घर, स्टोअर रूम किंवा दारा जवळ, घराच्या कोपऱ्यात कापूरचे छोटे तुकडे ठेवले तरी उंदीर त्या ठिकाणी थांबत नाहीत.

कापूर केवळ उंदरांना दूर ठेवण्याचे काम करतो असे नाही तर खोलीत चांगल्या प्रकारचा सुगंध पसरवण्याचे काम देखील करतो. कापुराच्या सुगंधामुळे घरात ताजेपणा राहतो आणि बॅक्टेरिया देखील दूर होतात.

अशाप्रकारे तुम्ही हा नैसर्गिक आणि रसायनमुक्त पद्धतीचा वापर करून  घरामध्ये झालेल्या उंदरांचा त्रासापासून मुक्ती मिळवू शकतात. कापूरचा वास हा केवळ उंदीरांनाच नाही तर इतर कीटकांना देखील घरापासून दूर ठेवण्यास मदत करतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts