गृहकर्ज का घ्यावे ? ‘हे’ 4 फायदे वाचून तुम्हीही Home Loan साठी अर्ज कराल

आपल्या देशात असेही काही लोक आहेत जे घरासाठी संपूर्ण रक्कम असतांनाही गृहकर्ज घेतात. मग अशावेळी प्रश्न पडतो की घरासाठी संपूर्ण रक्कम असतानाही लोक गृह कर्ज का घेतात, का लोक बँकांना व्याज देतात? पण मंडळी गृह कर्ज घेण्याचे देखील काही फायदे सुद्धा आहेत.

Tejas B Shelar
Published:
Home Loan Benefits

Home Loan Benefits : आपले एक स्वतःचे, हक्काचे घर असावे असे स्वप्न प्रत्येकाचे असते. स्वतःचे घर बनवण्यासाठी आपण अहोरात्र काबाडकष्ट करतो. आपण सर्वजण स्वतःचे घर खरेदी करणे ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी समजतो. मात्र घरांच्या वाढलेल्या किमती पाहता अनेकांना आपल्या आवडत्या लोकेशनवर घर खरेदी करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. आपल्या आयुष्यभराची सर्व जमापुंजी खर्च करूनही घर खरेदी करता येणे प्रत्येकाला शक्य होत नाही.

अशावेळी मग सर्वसामान्यांच्या पुढे होम लोनचा पर्याय उभा राहतो. घरासाठी पूर्ण रक्कम नसल्याने आपल्यापैकी अनेकांनी होम लोन घेऊन आपल्या घराचे स्वप्न पूर्ण केलंय. पण अनेकांना गृह कर्ज नकोसे वाटते, गृह कर्ज घेणे अनेकांना डोकेदुखी वाटते. घरासाठी लाखो रुपयांचे कर्ज तर घेतले जाईल मात्र ते फेडायचे कसे या विवंचनेत सर्वसामान्य लोक गृहकर्जापासून दूर राहतात. यामुळे अनेकजण गृह कर्ज घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणे पसंत करतात.

मात्र आपल्या देशात असेही काही लोक आहेत जे घरासाठी संपूर्ण रक्कम असतांनाही गृहकर्ज घेतात. मग अशावेळी प्रश्न पडतो की घरासाठी संपूर्ण रक्कम असतानाही लोक गृह कर्ज का घेतात, का लोक बँकांना व्याज देतात? पण मंडळी गृह कर्ज घेण्याचे देखील काही फायदे सुद्धा आहेत. दरम्यान, आज आपण या लेखातून गृह कर्जाचे नेमके फायदे कोणते ? बँकांना लाखों रुपयांचे व्याज देऊनही गृहकर्ज कसे फायद्याचे ठरते ? याच मुद्द्यांची माहिती पाहणार आहोत.

मंडळी, गृहकर्ज घेण्याचा पहिला फायदा म्हणजे, आपण जी मालमत्ता खरेदी केली आहे, ती विवादित तर नाही ना ? याची पडताळणी होते. बँका किंवा कोणत्याही वित्तीय संस्था कर्ज देण्यापूर्वी ती मालमत्ता विवादीत तर नाही ना, तिच्यावर इतर कर्ज, काही घोळ तर नाही ना? या सर्व गोष्टींची काळजीपूर्वक तपासणी करतात. त्यासंबंधीची कागदपत्र तपासतात अन मग गृह कर्ज मंजूर केले जाते. यामुळे मालमत्ता विकत घेताना आपल्याला सदर मालमत्तेवरून कोणताही वाद

विवाद नाही ना, त्याची कागदपत्रे यथायोग्य आहेत ना, तिच्यावर आधीचं एखाद कर्ज आहे का? या सर्व गोष्टींची माहिती मिळते.

गृहकर्ज घेण्याचा दुसरा मोठा फायदा म्हणजे कर वाचवता येतो. यामुळे आयकर भरणारे लोक कर वाचवण्यासाठी गृह कर्ज घेणे पसंत करतात. मित्रांनो, गृहकर्जामुळे करदात्यांना कर वाचवता येतो. आयकर अधिनियमाच्या कलम 24(b) अंतर्गत प्रत्येक आर्थिक वर्षात 2 लाख रुपयांची व्याज सवलत मिळते. म्हणजेच गृहकर्जावर जे व्याज आकारले जाते त्या व्याजावर कमाल दोन लाख रुपयांची सवलत मिळते. तसेच कलम 80 सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते.

गृहकर्ज घेण्याचा तिसरा मोठा फायदा म्हणजे इतर कर्जापेक्षा गृहकर्जावरील व्याजदर स्वस्त असते. वैयक्तिक कर्ज आणि गृह कर्जाच्या व्याजदराची तुलना केली तर ही तफावत फार मोठी आहे. म्हणून भविष्यात महागाईचे प्रमाण कमी राहिले तर गृहकर्जावरील व्याजदर पण कमी होते. त्याचा गृह खरेदीदारांना मोठा फायदा होत असतो. अशावेळी वाचलेल्या पैशाची बचत अथवा निवृत्ती निधीसाठी तरतूद करता येते.

गृह कर्ज घेण्याचा चौथा मोठा फायदा म्हणजे गृहकर्जावर टॉप-अप लोन सुद्धा मिळते. जर समजा तुम्ही जुने घर खरेदी केले अन तुम्हाला त्या जुन्या घराची डागडुजी करायची असेल, घराचे रिनोवेशन करायचे असेल किंवा मग इंटेरियरचे काम करायचे असेल तर अशावेळी तुम्ही टॉप अप होम लोन घेऊन त्याचा खर्च भागवू शकता. टॉप अप होम लोनचे व्याजदर हे सामान्य गृह कर्जापेक्षा अधिक असतात पण इतर कर्जांच्या तुलनेत टॉप अप होम लोनचे व्याजदर सुद्धा कमीच असतात.

मंडळी, याच कारणांमुळे अनेकजण पैसे असतानाही गृह कर्ज घेऊन घर खरेदी करण्याला प्राधान्य दाखवतात. काही लोकांना हे फायदे नको असतात म्हणून ते गृह कर्ज घेत नाहीत पण काही लोकांना या फायद्यांचा लाभ घ्यायचा असतो यामुळे ते पैसे असूनही गृहकर्ज घेतात. म्हणजेचं गृहकर्ज घेणे हे फक्त तोट्याचेचं असते असं नाही तर याचे काही फायदे देखील आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe