Home Loan News : एखाद्याच्या डोक्यावर आधीच गृह कर्ज असेल तर त्याला नवीन गृह कर्ज मिळू शकते का? असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत होता. दरम्यान आज आपण सर्वसामान्यांच्या याच प्रश्नांचे उत्तर तज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून सर्वसामान्यांना घर बनवताना खूपच अडचणींचा सामना करावा लागतो.
त्यामुळे अनेक जण घर बनवण्यासाठी गृह कर्ज घेतात. पण अनेकदा घर खरेदी केल्यानंतरही घरांच्या कामासाठी सर्वसामान्यांना पैशांची गरज भासते. घराच्या रिनोवेशन साठी किंवा इतर काही महत्त्वाच्या कामांसाठी पैशांची गरज भासते.
यामुळे अनेक जण आधीच होम लोन सुरू असताना नवीन होम लोन मिळू शकते का या संदर्भात विचारणा करतात. दरम्यान आता आपण एक होम लोन सुरू असताना दुसरे होम लोन मिळू शकत का? या संदर्भात बँकेचे काय नियम आहेत.
दुसरे होम लोन मिळत असेल तर किती मिळते आणि त्यासाठी व्याजदर आधीच्या कर्जापेक्षा अधिक लागतो का अशा अनेक प्रश्नांची माहिती आता आपण पाहणार आहोत. जर तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.
Top Up Home Loan ची प्रोसेस
जर तुमच्यावर आधीच एखादी होम लोन असेल आणि तुम्हाला परत होम लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला टॉप-अप होम लोन मिळू शकते. जसा आपण आपला दिवसाचा इंटरनेटचा रिचार्ज संपल्यानंतर टॉप अप मारत असतो तसाच काहीसा प्रकार हा होम लोन च्या बाबतीत आहे.
हे टॉप अप होम लोन घर खरेदी नंतर आवश्यक असणाऱ्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात मदत करते. होम लोन वर काम चालत नसेल तर टॉप-अप होम लोन घेऊ शकता. जर एखाद्याने होम लोन घेतले आणि घर बांधणे पूर्ण झाले नाही किंवा घर खरेदी नंतर त्याला घरात आणखी काही काम करायचे असेल तर अशावेळी हे टॉप अप होम लोन कामाचे ठरते.
टॉप-अप होम लोनमध्ये ही तुम्हाला अनेक चांगल्या डील्स मिळतात. मात्र, हे टॉप अप होम लोन अशाच ग्राहकांना दिले जाते ज्यांनी आपल्या आधीच्या कर्जाचा बारा महिन्यांचा ईएमआय न चुकवता भरला आहे.
टॉप-अप होम लोनच्या कालावधीबद्दल बोलायचं झाले तर या कर्जाचा कालावधी वेगवेगळ्या बँकांनुसार वेगवेगळा असतो. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आपण जे आधी घेतलेलं नॉर्मल होम लोन असतं त्याच्या अन टॉप-अप होम लोनच्या व्याजदरात फरक असतो.
टॉप अप होम लोन चा व्याजदर हा आधी घेतलेल्या नॉर्मल होम लोन पेक्षा अधिक असतो. जर तुम्हाला आधी नऊ टक्के व्याज दराने नॉर्मल होम लोन मिळाले असेल तर तुम्हाला टॉप अप होम लोन दहा ते अकरा टक्के दराने मिळणार आहे.