Home Loan News : तुम्हीही तुमच्या स्वप्नातील घरासाठी होम लोन घेण्याच्या तयारीत आहात का? अहो मग बँकेची पायरी चढण्याआधी आजची ही बातमी तुम्ही पूर्ण वाचायला हवी. कारण की आज आपण सर्वाधिक कमी व्याजदरात होम लोन देणाऱ्या देशातील टॉप 5 बँकांची माहिती पाहणार आहोत.
खरंतर अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि यामुळे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण होम लोन चा पर्याय स्वीकारत आहेत. मात्र कोणत्याही बँकेकडून गृह कर्ज घेण्यापूर्वी बॅक त्या बँकेच्या गृह कर्जाच्या व्याजदराची चौकशी करणे ग्राहकांसाठी फायदेशीर ठरते.
ज्या बँकेकडून ग्राहकांना कमी व्याजदरात गृह कर्ज मिळते त्याच बँकेकडून ग्राहकांनी कर्ज घेतले पाहिजे. अशा परिस्थितीत आज आपण सर्वात कमी व्याजदरात होम लोन देणाऱ्या बँकांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 75 लाख रुपयांच्या होम लोन साठी कोणते बँक किती व्याजदर लावते याच संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत.
सर्वात कमी व्याज दरात होम लोन देणाऱ्या बँका खालील प्रमाणे
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) : एसबीआय ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक. SBI आपल्या ग्राहकांना 8.50 टक्के ते 9.85 टक्के व्याजदराने 75 लाख रुपयांचे गृहकर्ज देते. हा व्याजदर तुमच्या CIBIL स्कोअरवर अवलंबून आहे. सिबिल स्कोर कमी असेल तर व्याजदर अधिक लागेल आणि सिबिल स्कोर जास्त असेल तर व्याजदर कमी लागणार आहे.
बँक ऑफ बडोदा : बँक ऑफ बडोदा ही देखील देशातील एक प्रमुख सरकारी बँक आहे. तुम्ही बँक ऑफ बडोदाकडून 75 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतल्यास तुम्हाला हे कर्ज 8.40 टक्के ते 10.90 टक्के व्याजदराने मिळेल.
युनियन बँक ऑफ इंडिया : युनियन बँक ऑफ इंडिया देखील भारतातील एक प्रमुख सरकारी बँक म्हणून ओळखली जाते आणि ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स काढते. आपल्या ग्राहकांना 8.30 टक्के ते 10.90 टक्के व्याजदराने 75 लाख रुपयांचे गृहकर्ज देते.
पंजाब नॅशनल बँक : पंजाब नॅशनल बँक देखील पब्लिक सेक्टर मधील एक प्रमुख आणि अगदीच लोकप्रिय बँक आहे. या बँकेत करोडो. लोकांची खाती आहेत. पंजाब नॅशनल बँकेत 75 लाख रुपयांच्या गृहकर्जासाठी 8.40 टक्के ते 10.25 टक्के व्याजदर आहे.
बँक ऑफ इंडिया : बँक ऑफ इंडिया ही पब्लिक सेक्टर मधील आणखी एक महत्त्वाची बँक. जर तुम्ही बँक ऑफ इंडियाकडून 75 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल तर तुम्हाला हे कर्ज 8.35 टक्के ते 11.10 टक्के व्याजदराने मिळेल.