Home Loan News : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे एक हक्काचे घर असावे असे स्वप्न असेल, नाही का? पण घराचे स्वप्न सहजचं पूर्ण होत नाही. अलीकडे घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत, मुंबई पुणे नाशिक नागपूर सारख्या महानगरांमध्ये घर घेणे सोपी बाब राहिलेली नाही.
यामुळे अनेक जण घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम लोन चा पर्याय स्वीकारतात. दरम्यान जर तुम्ही ही नजीकच्या भविष्यात स्वतःच्या हक्काच्या घरासाठी होम लोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे.
कारण की आज आपण आयसीआयसीआय बँकेच्या होम लोन ची माहिती पाहणार आहोत. आयसीआयसीआय ही देशातील दुसरी सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून ओळखली जाते.
ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. आज आपण या बँकेच्या गृह कर्जाची माहिती पाहणार आहोत.
आयसीआयसीआय बँकेच्या गृह कर्जाचे व्याजदर
मिळालेल्या माहितीनुसार आयसीआयसीआय बँक आपल्या ग्राहकांना पाच कोटी रुपयांपर्यंतचे गृह कर्ज नऊ टक्के व्याजदराने ऑफर करत आहे. मात्र बँकेचा हा किमान व्याजदर असून याचा लाभ फक्त आणि फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असतो त्यांनाच मिळतो.
म्हणजे जर तुमचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असेल तर तुम्हाला आयसीआयसीआय बँकेकडून नऊ टक्के दराने कर्ज उपलब्ध होणार आहे.
दरम्यान आता आपण आयसीआयसीआय बँक कडून जर चाळीस लाख रुपयांचे कर्ज 15 वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागू शकतो यासाठी किती व्याज भरावे लागणार या संदर्भात डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
चाळीस लाखांचे कर्ज घेतल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार
आयसीआयसीआय होम लोन कैलकुलेटर नुसार जर एखाद्या ग्राहकाला 9% व्याजदराने 40 लाख रुपयांचे गृह कर्ज 15 वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर सदर व्यक्तीला 40,571 रुपये ईएमआय भरावा लागणार आहे.
म्हणजेच या कालावधीत सदर व्यक्तीला 73 लाख 2 हजार 780 रुपये भरावे लागणार आहेत. अर्थातच सदर व्यक्तीला 33 लाख 2 हजार 780 रुपये व्याज म्हणून बँकेला द्यावे लागणार आहेत.