Home Loan News : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज ऑफर करते. बँकेकडून गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, सुवर्णं तारण कर्ज अगदीच कमी व्याजदरात उपलब्ध करून दिले जात आहे.
एसबीआयच्या होम लोन बाबत बोलायचं झालं तर ही बँक आपल्या ग्राहकांना किमान 8.50% व्याजदरावर होम लोन उपलब्ध करून देत आहे. यामुळे जर तुम्हाला तुमच्या स्वप्नाच्या घरांसाठी कर्ज घ्यायचे असेल तर एसबीआयचा पर्याय तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे.
दरम्यान आज आपण एसबीआयच्या होम लोनची सविस्तर माहिती पाहणार आहोत. एसबीआय कडून जर 25 लाख रुपयांचे होम लोन दहा वर्षांसाठी घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागणार, या कर्जासाठी किती व्याज द्यावे लागणार याचे आज आपण कॅल्क्युलेशन पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
SBI चे Home Loan फायदेशीर ठरणार!
मिळालेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या स्थितीला आपल्या ग्राहकांना किमान 8.50% या इंटरेस्ट रेट वर होम लोन देत आहे. मात्र या इंटरेस्ट रेट वर जर होम लोन घ्यायचे असेल तर यासाठी ग्राहकांचा सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे.
ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असतो अशा ग्राहकांना एसबीआय कडून किमान व्याजदरात गृह कर्ज पुरवले जाते. जर समजा एखाद्या ग्राहकाला एसबीआय कडून किमान 8.50% व्याजदरावर 25 लाख रुपयांचे गृह कर्ज दहा वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर त्याला कितीचा हप्ता भरावा लागणार याचे आता आपण कॅल्क्युलेशन समजून घेऊयात.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या होम लोन कॅल्क्युलेटर नुसार दहा वर्षे कालावधीसाठी 25 लाख रुपयांचे गृह कर्ज 8.50% व्याजदर मंजूर झाले तर सदर व्यक्तीला 30,996 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच या कालावधीत सदर व्यक्तीला 37 लाख 19 हजार 520 रुपये बँकेला द्यावे लागणार आहेत. यामध्ये 25 लाख रुपये मुद्दल आणि 12 लाख 19 हजार 520 रुपये व्याज राहणार आहे.