Ahmednagar Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची फारच चर्चा पाहायला मिळत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. यासाठी एक जुलैपासून अर्ज भरले जात असून 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यत्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे. वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरतील.
या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून पैसे दिले जाणार आहेत. म्हणजे 31 ऑगस्ट पर्यंत ज्या महिला अर्ज सादर करतील त्यांना जुलै महिन्यापासून पैसा मिळणार आहे. जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकाच वेळी पात्र महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. हे पैसे रक्षाबंधनाच्या आधीच पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याचा सरकारचा सुनियोजित प्लॅन आहे.
17 ऑगस्ट ला लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्टचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्याचा सरकारचा प्लॅन असून याच योजने संदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे. ही माहिती अहमदनगर जिल्ह्यातील महिलांसाठी खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातून आत्तापर्यंत सात लाख आठ हजार अर्ज दाखल झाले आहेत.
विशेष म्हणजे अर्ज सादर करण्यास आणखी काही काळ शिल्लक असल्याने अर्जाची ही संख्या आणखी वाढणार आहे. सादर झालेल्या अर्जांपैकी आतापर्यंत सहा लाख 80 हजार महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत. 25 हजार अर्जात त्रुटी आढळून आली असल्याने ते अर्ज तात्पुरते बाद झाले आहेत. ज्या अर्जांमध्ये त्रुटी आहे ते अर्ज पुन्हा एकदा दुरुस्त करून सादर करता येणार आहेत.
कागदपत्रे अपूर्ण असणे, आधारकार्डची एकच बाजू अपलोड, माहिती अपूर्ण, बँक डिटेल नसणे, हमीपत्रावर स्वाक्षरी नाही अशा विविध कारणांमुळे अर्ज बाद करण्यात आले आहेत. पण अर्ज रिजेक्ट झाला म्हणून चिंता करण्याचे काही कारण नाही कारण की अर्जात दुरुस्ती करून तो अर्ज पुन्हा एकदा जमा करता येणार आहे. आता आपण कोणत्या तालुक्यातून किती महिलांचा अर्ज मंजूर झाला आहे याबाबतची आकडेवारी पाहणार आहोत.
कोणत्या तालुक्यातील किती महिला पात्र?
नगर : 80 हजार 847
पारनेर : 43 हजार 791
कोपरगाव : 41 हजार 403
श्रीरामपूर : 45 हजार 19
राहुरी : 53 हजार 236
राहाता : 52 हजार 569
संगमनेर : 83 हजार 788
अकोले : 43 हजार 783
नेवासा : 56 हजार 19
शेवगाव : 36 हजार 455
पाथर्डी : 34 हजार 36
जामखेड : 26 हजार 697
कर्जत : 36 हजार 719
श्रीगोंदा : 42 हजार 614