How To Check PF Amount : आजची ही बातमी देशातील जवळपास सर्वच नोकरदार वर्गांसाठी अति महत्त्वाची आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, भविष्य निर्वाह निधी संघटनेने नुकतीच व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा साहजिकच नोकरदार वर्गाला फायदा होणार आहे.
यामुळे पीएफ खात्यात जमा असलेल्या रकमेवर आता अधिक व्याज मिळणार आहे. पण अनेकांना नेमकी पीएफ खात्यात किती जमा रक्कम आहे याची माहिती नसते. त्यामुळे आज आपण पीएफ खात्यात नेमकी किती रक्कम जमा आहे? हे कसं पाहायचं याविषयीची सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- पुणे, अहमदनगरकरांना मिळणार गोड बातमी ! पुणे-अहमदनगर रेल्वे सुरु होणार, रेल्वे बोर्डाच्या सदस्याने दिली माहिती
मात्र आम्ही ज्या पद्धती सांगत आहोत त्या पद्धतीने पीएफ खात्यातील रक्कम जाणून घेण्यासाठी संबंधित व्यक्तीला इ-नोमिनेशन या ठिकाणी करावे लागणार आहे. इ-नॉमिनेशन केलेल्या व्यक्तीलाच आम्ही ज्या पद्धती सांगत आहोत त्या पद्धतीचा वापर करून आपल्या खात्यातील पीएफ रक्कम माहिती करता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया पीएफ रक्कम तपासण्याची पद्धत.
एसएमएस करून पीएफ रक्कम पाहता येते बरं
एसएमएस वरून पीएफ रक्कम जाणून घेण्यासाठी EPFO कडे ज्या नंबर वर रजिस्ट्रेशन केलेले असेल त्या नंबर वरून एक एसएमएस पाठवावा लागतो. 7738299899 या इपीएफओच्या अधिकृत नंबर वर तुमच्या रजिस्ट नंबरने EPFOHO आणि मग स्पेस देऊन तुमचा यूएन नंबर टाकावा आणि हा sms सेंड करावा. म्हणजे EPFOHO UAN नंबर टाकून तुम्हाला 7738299899 या नंबर वर मेसेज पाठवावा लागतो. हा मेसेज पाठवला की लगेचच तुम्हाला मेसेज द्वारे तुमच्या पीएफ खात्यात किती रक्कम आहे याबाबत कळवले जाते.
हे पण वाचा :- नांदेडच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! कोरडवाहू जमिनीवर सुरू केली पेरूची शेती; एकरी 120 टन उत्पादनाची साधली किमया, बनला लखपती