IDBI Bank FD Scheme : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरंतर अलीकडे फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बँकांकडून चांगला परतावा दिला जात आहे.
देशातील अनेक प्रमुख सरकारी, खाजगी तसेच स्मॉल फायनान्स बँकांच्या माध्यमातून एफ डी वर चांगले व्याज दिले जात आहे. आयडीबीआय बँक देखील आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगले व्याज ऑफर करते.
आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून काही विशेष FD योजना देखील सुरु करण्यात आल्या आहेत. आयडीबीआय बँकेने सातशे दिवसांची विशेष FD योजना सुरू केली आहे.
या योजनेला बँकेच्या माध्यमातून उत्सव एफ डी योजना असे नाव देण्यात आले आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी बँकेने या योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे.
आता या योजनेत ग्राहकांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. अशा परिस्थितीत, आज आपण आयडीबीआय बँकेच्या या सातच्या दिवसांच्या विशेष एफडी योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे IDBI बँकेची विशेष FD योजना ?
आयडीबीआय बँकेची सातशे दिवसांची विशेष एफ डी योजना ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे या योजनेत आतापर्यंत हजारो लोकांनी गुंतवणूक केली आहे.
या योजनेला मिळत असणारी लोकप्रियता पाहता बँकेने याची मुदत सुद्धा वाढवली आहे. सध्या आयडीबीआय बँक या एफ डी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 7.20% या रेटने व्याज देत आहे.
मात्र याच योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना 0.50 टक्के अधिकचे रेट लागू आहेत. अर्थातच सिनिअर सिटीजन ग्राहकांनी जर या योजनेत गुंतवणूक केली तर त्यांना 7.70% व्याज मिळणार आहे.
7 लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार ?
जर एखाद्या ग्राहकाने आयडीबीआय बँकेच्या 700 दिवसांच्या विशेष एफ डी योजनेत सात लाख रुपये गुंतवले तर त्यांना सात लाख 99 हजार 845 रुपये मिळणार आहेत. अर्थातच सामान्य ग्राहकांना या योजनेतून 99845 रुपये रिटर्न मिळणार आहेत.
तसेच जर सिनिअर सिटीजन ग्राहकाने या योजनेचा सात लाख रुपये गुंतवले तर त्यांना मॅच्युरिटी वर अर्थात सातशे दिवसांचा काळ पूर्ण झाल्यानंतर आठ लाख 7 हजार 14 रुपये म्हणजेच एक लाख 7 हजार 14 रुपये रिटर्न म्हणून दिले जाणार आहेत.