स्पेशल

भारतात ‘या’ ट्रेनमधून करता येतो मोफत प्रवास! दररोज करतात 800 लोक प्रवास; पर्यटनासाठी आहे विशेष

Bhakra-Nangal Train:- भारतीय रेल्वे नेटवर्क जर आपण बघितले तर ते उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत तर पूर्वेपासून पश्चिमे पर्यंत विस्तारले आहे. इतकेच नाही तर भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये नवीन अशा रेल्वे मार्गांचे काम सध्या सुरू असून जास्तीत जास्त प्रमाणात कनेक्टिव्हिटी आणि वेगवान प्रवासासाठी अनेक रेल्वे प्रकल्प ही महत्त्वाची ठरणार आहेत.

भारतीय रेल्वेच्या दृष्टिकोनातून बघितले तर अनेक रेल्वेस्टेशन किंवा रेल्वेमार्ग यांची एक विशेषता असून काही निश्चित वैशिष्ट्यांसाठी ती जगप्रसिद्ध आहेत. भारतीय रेल्वेमध्ये आपल्याला अनेक बाबतीत वेगळेपण दिसून येते. उदाहरण घ्यायचे झाले तर काही भारतीय रेल्वे स्टेशन असे आहेत की त्या ठिकाणी उतरून तुम्ही थेट दुसऱ्या देशामध्ये देखील प्रवेश करू शकता.

यासारखी अनेक वैशिष्ट्यपूर्ण अशा अनेक गोष्टी भारतीय रेल्वेच्या बाबतीत आपल्याला सांगता येतील.अशाच पद्धतीने भारतामध्ये अशी एक ट्रेन आहे की त्यामध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला तिकिटाची गरज भासत नाही. तुम्ही हव्या तितक्या वेळी या माध्यमातून मोफत प्रवास करू शकतात.

भाकरा-नांगल ट्रेनने करता येतो मोफत प्रवास
भारतामध्ये मोफत प्रवास करता येणारी ही ट्रेन म्हणजे भाकरा नांगल ट्रेन होय.ही ट्रेन देशातील पंजाब आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या दरम्यान धावते. हे ट्रेन गेल्या 75 वर्षापासून कुठल्याही भाड्याशिवाय १३ किलोमीटरचा प्रवास करते. विशेष म्हणजे प्रवाशांकडून एक रुपया देखील या प्रवासासाठी घेतला जात नाही.

भाकरा नांगल ट्रेनचा जो काही मार्ग आहे तो पर्यटनच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचा व अतिशय सुंदर आहे. या ट्रेनचा एकूण रूट जर बघितला तर ती शिवालिक टेकड्यांमधून जाते व त्या अगोदर ती सतलज नदी पार करते. पूर्ण प्रवास करताना ही ट्रेन तीन बोगदे आणि सहा स्टेशन पार करून जाते.

या ट्रेनचे कोच आहेत वैशिष्ट्यपूर्ण
या ट्रेनची कोच लाकडी असून त्यांची संख्या फक्त तीन आहे. या कोच मधील ज्या काही खुर्च्या आहेत त्या देखील ब्रिटिशकालीन असून त्या आजपर्यंत जतन करून ठेवले आहेत. ही ट्रेन साधारणपणे 1953 पासून डिझेल इंजिन वरच धावते.

या ट्रेनची सुरुवात होण्यामागचा इतिहास जर बघितला तर भारतातील प्रसिद्ध असलेले भाकरा नांगल धरणाचे जेव्हा काम सुरू झाले तेव्हा 1948 मध्ये ही ट्रेन या कामासाठी लागणारे मजूर आणि बांधकाम साहित्य याची वाहतूक करता यावी याकरिता सुरू करण्यात आली होती. ही ट्रेन भारतीय रेल्वेच्या अंतर्गत नसून भाकरा इंटरेस्ट मॅनेजमेंट बोर्डाच्या व्यवस्थापनाखाली आहे.

जेव्हा हे धरणाचे काम पूर्ण झाले तेव्हा ही ट्रेन न थांबवता ती पर्यटक आणि स्थानिक लोकांसाठी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला व ते आतापर्यंत चालू आहे.या ट्रेन मधून दररोज आठशे प्रवासी प्रवास करतात व ही ट्रेन पर्यटकांसाठी फायद्याची आहेस परंतु स्थानिक लोकांसाठी देखील प्रवासासाठी फायद्याची आहे.

पर्यटकांसाठी आहे उत्तम
या ट्रेनने प्रवास करताना हिमाचल प्रदेश आणि पंजाब या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य पाहण्याची संधी मिळते. सतलज नदी आणि शिवालिक टेकड्या दरम्यान या ट्रेनने प्रवास करणे अनोख्या अशा निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्याच्या दृष्टिकोनातून खूप फायद्याचा आहे.

त्यामुळे तुम्हाला जर विना तिकीट रेल्वेचा प्रवास करायचा असेल व सुंदर असे निसर्ग सौंदर्य पहायचे असेल तर तुमच्याकरिता भाकरा नांगल ट्रेन हा एक चांगला पर्याय आहे. या ट्रेनचा प्रवास करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही पद्धतीने तिकीट बुक करण्याची गरज नाही. त्यामुळे अवश्य एकदा या ट्रेनने प्रवास करावा व मोफत असा निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्यावा.

Ajay Patil

Published by
Ajay Patil