स्पेशल

हिवाळ्याच्या थंडीत सकाळी उठल्यावर सगळ्यात अगोदर ‘या’ पदार्थांचे सेवन करा! मिळेल शरीराला ऊर्जा व शरीर राहील निरोगी

Health Tips In Winter Season:- शरीराच्या उत्तम आरोग्या करिता संतुलित आहाराचे सेवन करणे हे खूप फायद्याचे ठरते. संतुलित आहाराच्या सेवनाने शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक आणि जीवनसत्त्वे योग्य प्रमाणात मिळतात व त्याचा अनेक दृष्टीने फायदा शरीराला होत असतो व शरीर निरोगी राहायला मदत होते.

आपल्यापैकी प्रत्येकाला सकाळी नाष्टा करण्याची सवय असते व असे म्हटले जाते की तुम्ही सकाळी अगोदर पहिल्यांदा जी गोष्ट खाता त्याचा शरीरावर खूप चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो व हा परिणाम तुम्ही कुठल्या पदार्थाचे सेवन करता त्यावर अवलंबून असते.

शरीराला ऊर्जा मिळण्याच्या दृष्टिकोनातून व चयापचायला गती मिळावी यासाठी देखील आपण सकाळी जे खातो किंवा पितो त्याचा खूप मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी कोणत्या पदार्थांच्या सेवन करावे? जेणेकरून आरोग्य ठणठणीत राहील, याबाबत आपल्याला माहिती असणे तितकेच गरजेचे आहे.

सकाळी सगळ्यात अगोदर या पदार्थांचे सेवन करा

1- गुळ आणि कोमट पाण्याचे सेवन- सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा सगळ्यात अगोदर गुळाचा एक तुकडा आणि कोमट पाणी पिऊ शकतात. हे पाणी पिल्यामुळे शरीराला उर्जा तर मिळते व त्यासोबतच लोह मिळण्यास देखील मदत होते

व त्यामुळे ॲनिमियाचा त्रास होणार नाही. तसेच दररोज तुम्ही या पाण्याचे सेवन करत असाल तर शरीर डिटॉक्स व्हायला मदत होते व पोट देखील साफ होऊन वजन कमी होण्यास मदत होते.

2- एक चमचा मध- गुळा व्यतिरिक्त तुम्ही कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून देखील ते पाणी पिऊ शकतात. असं केल्यामुळे हिवाळ्यामध्ये शरीर उबदार राहायला मदत होते व शरीर देखील स्वच्छ होते.

इतकेच नाही तर हिवाळ्यामध्ये सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्यांपासून संरक्षण मिळते. त्यामुळे सकाळी उठल्यावर या दोन्ही गोष्टींचे सेवन करावे.

3- दालचिनीचा चहा- तसेच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही जर सकाळी दालचिनीचा चहा पिला तर त्याचा देखील खूप मोठा फायदा आरोग्याला होतो. दालचिनीचा चहा देखील हिवाळ्यात फायद्याचा ठरू शकतो.

सकाळी मात्र या गोष्टी टाळा
परंतु यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की सकाळी सर्वात आधी साखर किंवा आंबट पदार्थांचे सेवन करू नये. जर अशा पद्धतीने या पदार्थांचे सेवन केले गेले तर ऍसिडिटी आणि गॅसची समस्या निर्माण होते. तुम्हाला हिवाळ्यामध्ये जर सकाळची सुरुवात करायची असेल तर जे पदार्थ शरीराला उबदार ठेवू शकतील त्या गोष्टींनीच करावी.

( टीप- वरील माहिती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली आहे. या माहितीच्या अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचे समर्थन करत नाही अथवा या माहिती विषयी दावा करत नाही.)

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts