Indian Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता पैसे नसले तरीही रेल्वेचे तिकीट रेल्वे प्रवाशांना बुक करता येणार आहे. यासाठी भारतीय रेल्वेने एक विशेष सुविधा सुरू केली आहे.
खरं पाहता, भारतात रेल्वेच्या प्रवासाला सर्वाधिक पसंती दाखवली जाते. याचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा स्वस्तात होतो शिवाय हा प्रवास सुरक्षित मानला गेला आहे. याहूनही एक मोठे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा अधिक गतिमान आहे.
तसेच भारतीय रेल्वेचे जाळे हे देशातील कानाकोपऱ्यातून विस्तारले आहे. यामुळे कुठेही प्रवास करायचा असला तर सर्वप्रथम रेल्वेला पसंती दाखवली जाते. हेच कारण आहे की देशातील करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात.
हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! इंडियन नेव्ही मध्ये तब्बल 372 रिक्त पदांसाठी निघाले भरती, अर्ज कुठं करणार? पहा…
यामुळे भारतीय रेल्वेच्या महसुलात देखील चांगलीच वाढ झाली आहे. दरम्यान भारतीय रेल्वेच्या माध्यमातूनही आपल्या प्रवाशांसाठी कायमच नवनवीन सुविधा सुरू केल्या जातात. रेल्वे प्रवाशांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी रेल्वे नेहमीच पुढाकार घेते. अशातच आता पैसे नसतानाही तिकीट बुक करता येणार अशी सुविधा भारतीय रेल्वेने सुरू केली आहे.
नाव बाय पे लेटर असं या सुविधेचं नाव असून या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पेटीएम या UPI अँप्लिकेशनचा वापर करावा लागणार आहे. दरम्यान आज आपण या सुविधेचा वापर कसा केला जाऊ शकतो याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा :- पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ! सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात ‘या’ पदासाठी निघाली भरती, आजच इथं करा अर्ज
पैसे नसताना या पद्धतीने करा तिकीट बुकिंग
यासाठी सर्वप्रथम तुम्हाला भारतीय रेल्वेचे अधिकृत एप्लीकेशन डाउनलोड करावे लागणार आहे. आपण प्ले स्टोअर वर जाऊन हे ॲप्लिकेशन निशुल्क डाऊनलोड करू शकता. किंवा https://play.google.com/store/apps/details?id=cris.org.in.prs.ima या लिंक वर जाऊन देखील प्ले स्टोर वरून हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता.
हे एप्लीकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर आपणास या अँप्लिकेशनमध्ये लॉगिन करावे लागणार आहे.
यानंतर तुम्हाला बुकिंग करावे लागणार आहे. यासाठी तुम्ही तुमच्या प्रवासाचे नाव, तारीख, बोर्डिंग स्टेशनचे नाव भरा.
आता तुम्हाला ज्या ट्रेनमधून प्रवास करायचा आहे ते निवडा आणि बुकिंगसाठी पुढे जा.
यानंतर तुम्ही पेमेंट सेक्शनमध्ये पोहोचाल, त्यानंतर तुम्हाला Buy Now Pay Later चा पर्याय दिसेल. तो सिलेक्ट करा. यानंतर तुम्हाला पेटीएम पोस्ट पेमेंट निवडावे लागेल आणि तुमचे पेटीएम लॉग इन करावे लागेल.
आता तुमच्याकडे व्हेरिफिकेशन कोड असेल, तो भरल्यानंतर तुमचे तिकीट बुक होणार आहे.
हे पण वाचा :- तुम्ही घरात किती रोकड रक्कम ठेऊ शकतात? घरात अधिक कॅश ठेवल्यास काय होते ? आयकर विभागाचा नियम वाचाच !