Indias Longest Highway : गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात विशेषता केंद्रात नरेंद्र मोदी सरकारने सत्ता स्थापित केल्यानंतर महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात मोठ-मोठ्या महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात देखील समृद्धी महामार्गासारख्या अनेक महत्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. तसेच अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे महाराष्ट्रात पूर्ण झाली आहे आणि काही महामार्ग प्रकल्पांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.
मुंबई दिल्ली महामार्ग प्रकल्प देखील असाच एक महत्त्वकांक्षी महामार्ग प्रकल्प आहे. हा महामार्ग 1350 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. सध्या या महामार्ग प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या काही दिवसांनी याचे काम पूर्णत्वाला जाईल अशी आशा आहे. पुढील वर्षी या महामार्ग प्रकल्पाचे काम पूर्ण होईल असे म्हटले जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे या महामार्गाचा एक महत्वाचा टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. या महामार्ग प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली दरम्यान चा प्रवास बारा तासात पूर्ण होईल असा दावा केला जात आहे. सध्या मुंबई ते दिल्ली दरम्यानचा प्रवास पूर्ण करण्यासाठी नागरिकांना 24 तासांचा कालावधी लागतोय.
मात्र जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा हा प्रवासाचा कालावधी 12 तासांवर येणार आहे म्हणजेच प्रवाशांचा निम्मा वेळ वाचेल. पण तुम्हाला भारतातील सर्वाधिक लांब महामार्ग कोणता हे माहितीये का ? आज आपण भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणजेच नॅशनल हायवे 44 ची माहिती पाहणार आहोत.
हा महामार्ग देशातील सर्वात लांब महामार्ग म्हणून ओळखला जातो. हा मार्ग देशातील अनेक राज्यांमधून जातो. NH 44 काश्मीर ते कन्याकुमारी या दरम्यान विस्तारलेला असून हा महामार्ग भारताचे दर्शन घडवतो.
या महामार्गाची लांबी तब्बल तीन हजार किलोमीटर एवढी असून या 3000 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीच्या या प्रवासात नद्या, पर्वत, धबधबे, समुद्र हे सर्व पाहायला मिळते.
NH 44 भारताच्या उत्तरेकडील काश्मीरपासून सुरू होतो आणि दक्षिणेला असलेल्या कन्याकुमारीपर्यंत जातो. राष्ट्रीय महामार्ग- 44 काश्मीरमधील श्रीनगरपासून सुरू होतो आणि कन्याकुमारी येथे संपतो. हा राष्ट्रीय महामार्ग सुमारे 4,112 किलोमीटर लांबीचा आहे.
या भारतातील सर्वाधिक लांबीच्या महामार्गाचे जुने नाव NH-7 आहे. काश्मीरमध्ये, बर्फाने भरलेल्या पर्वत आणि धबधब्यांच्या दृश्यांनी सुरुवात होते, तर पंजाबमध्ये पोहोचेपर्यंत मोहरीचे शेत प्रवाशांना भुरळ घालते. हा राष्ट्रीय महामार्ग हरियाणा आणि दिल्ली मार्गे उत्तर प्रदेशात प्रवेश करतो.
त्यानंतर तो राजस्थानमार्गे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात येतो. महाराष्ट्रानंतर राष्ट्रीय महामार्ग तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागातून जातो आणि कर्नाटकातील जंगले ओलांडून कन्याकुमारी येथे संपतो.