स्पेशल

काय सांगता ! ‘या’ मुख्यमंत्र्यांकडे आहे सर्वात जास्त पैसा; महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांकडे किती कोटी, पहा कोट्याधीश मुख्यमंत्र्यांची यादी

Indias Richest Chief Minister List : नमस्कार ! लोकशाही सुधारणावादी संघटनेने नुकताच एक महत्त्वाचा अहवाल सार्वजनिक केला आहे. हा अहवाल आहे देशातील मुख्यमंत्र्यांकडे किती संपत्ती आहे याचा. हा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर देशातील मुख्यमंत्र्यांकडे एकूण किती संपत्ती आहे याची माहिती जनतेपुढे आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांकडे किती संपत्ती आहे याची देखील माहिती समोर आली आहे.

लोकशाही सुधारणावादी संघटनेने निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीच्या विश्लेषणानंतर हा अहवाल तयार केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान आज आपण देशातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या टॉप 10 मुख्यमंत्र्यांची यादी जाणून घेणार आहोत तसेच महाराष्ट्राच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांकडे एकूण किती संपत्ती आहे याची देखील माहिती या निमित्ताने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता बँका देणार वाढीव पीककर्ज, कोणत्या पिकाला किती कर्ज? पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

देशातील टॉप 10 श्रीमंत मुख्यमंत्री खालील प्रमाणे

या अहवालात नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे एकूण 510 कोटी रुपयांपेक्षा अधिकची संपत्ती आहे. यानंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती असून ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. पेमा खंडू यांच्याकडे 163 कोटी रुपयांपेक्षा अधिकची संपत्ती आहे.

यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहेत ते ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक. त्यांच्याकडे एकूण 63 कोटी रुपयांपेक्षा अधिकची संपत्ती आहे. आता आपण चौथ्या क्रमांकापासून ते दहा नंबर पर्यंत कोणत्या मुख्यमंत्र्यांकडे अधिक पैसा आहे याची माहिती जाणून घेऊया. आंध्र प्रदेश- ₹५१०.३८ कोटी, अरुणाचल- ₹१६३.५० कोटी, ओडिशा- ₹६३.८७ कोटी, नागालॅंड- ₹४६.९५ कोटी, पद्दुचेरी- ₹३८.३९ कोटी, तेलगंणा- ₹२३.५५ कोटी, छत्तीसगड- ₹२३.०५ कोटी, आसाम- ₹१७.२७ कोटी, मेघालय- ₹१४.०६ कोटी, त्रिपुरा- ₹१३.९० कोटी.

हे पण वाचा :- विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! आता 10 ते 15 दिवसांत मिळणार कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट; ‘या’ ठिकाणी करा अर्ज, ही कागदपत्रे तयार ठेवा, पहा…..

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांकडे किती कोटी?

या अहवालात नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 11.56 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते देशातील अकरावे सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री आहेत.

कमी श्रीमंत मुख्यमंत्री कोण?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती आहे. त्यांच्याकडे केवळ 15 लाख रुपयांची एकूण संपत्ती असल्याची माहिती या अहवालात नमूद करण्यात आली आहे. 

हे पण वाचा :- सावधान ! आज ‘या’ भागात पडणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts