भारताचा उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत विचार केला तर निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक, सामाजिक वेगळेपण मोठ्या प्रमाणावर दिसून येते. जर राज्यनिहाय विचार केला तर प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या परंपरा तसेच वेशभूषा देखील वेगवेगळ्या आहेत. भारतातील अशी अनेक गावे आहेत ते या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य आणि भौगोलिक दृष्ट्या इतर गावांपेक्षा खूप वेगवेगळ्या असून स्वर्गापेक्षा देखील सुंदर आहेत. याबाबत प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी या 10 सुंदर गावांची यादी सोशल मीडियावर शेअर केले असून या ठिकाणांना भेट देण्याचे माझे स्वप्न आहे असे त्यांनी नमूद केले आहे. भारतातील हे दहा सुंदर गावे कोणते आहेत याबद्दल आपण माहिती घेऊ.
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेली 10 सुंदर गावांची यादी
1- कल्पा गाव– हे गाव हिमाचल प्रदेशातील किन्नोर जिल्ह्यात असून या गावाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावाच्या अगदी भोवती म्हणजे ज्या गावाला संपूर्णपणे सफरचंदाच्या बागांनी वेढलेली आहे. हे गाव सतलज नदीच्या काठावर वसले असून स्वर्गासारखे सुंदर असे ठिकाण आहे. त्याचे समुद्रसपाटीपासून 2960 मीटर उंचीवर असून या उंचीवर हिमालयातील अनेक बर्फाने आच्छादलेली शिखरे दिसतात.
2- मौलीनॉन्ग– हे गाव मेघालय राज्यात असून पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात आहे. या गावाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे डिस्कवर इंडिया मासिकाने या गावाला आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गावाचा दर्जा दिला असून शिलॉंग पासून 90 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. त्याच्या गावाला गार्डन ऑफ गॉड असे देखील ओळखले जाते.
3- कोलेनगोडे– हे गाव केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यात असून जिल्हा मुख्यालय पासून याच्या आंतर 26 किलोमीटर इतके आहे. महत्वाचे म्हणजे या गावाच्या अवतीभवती नदी तसेच पर्वताने सुंदर नैसर्गिक दृश्यांनी हे गाव परिपूर्ण आहे.
4- माथुर– हे गाव तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी जिल्ह्यात वसलेले असून आशियातील सर्वात लांब आणि उंच पूल या ठिकाणी बांधलेला असून कन्याकुमारीहून टॅक्सी करून या गावांमध्ये जाता येते.
5- वारंगा– हे कर्नाटक राज्यातील उडपी जिल्ह्यात असलेले गाव असून हे खूप सुंदर अशा जैन मंदिरांसाठी ओळखले जाते. या गावांमध्ये जे काही जैन मंदिरांचे बांधकाम करण्यात आलेले आहेत ते सुमारे एक हजार वर्षे इतके जुनी आहेत.
6- गोरखे खोला– पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये असलेले एक गाव असून ते खूप सुंदर आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावाला उंच देवदार वृक्षांनी वेढलेले असून त्याच्या काठावर वसलेले आहे. या गावाच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटक या ठिकाणी आकर्षित होतात. गावाच्या सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात फक्त 30 कुटुंब राहतात. परंतु वर्षभर पर्यटकांची या ठिकाणी गर्दी असते.
7- चंद्रगिरी( जिरंग )- ओडीसा राज्याच्या गजपती जिल्ह्यात हे गाव वसलेले असून या गावाला जिरंग या नावाने देखील ओळखले जाते. हे गाव गौतम बुद्धांच्या मठासाठी प्रसिद्ध असल्यामुळे या गावाला ओडिसाचे तिबेट म्हणून देखील ओळखले जाते. चंद्रगिरी डोंगराच्या सुंदर खोऱ्यामध्ये हे गाव वसलेले असून सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे.
8- झिरो गाव– हे गाव अरुणाचल प्रदेश राज्यातील लोअर सुबनसिरी जिल्ह्यात वसलेले असून समुद्रसपाटीपासून 5000 फूट उंचीवर हे गाव वसलेले असल्यामुळे या ठिकाणी वर्षभर हवामान आल्हाददायक असते.
9- मानागाव– या उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात असून या गावाला भारताचे शेवटचे गाव म्हणून देखील ओळखले जाते. कारण या गावाच्या पलीकडे चिनची बॉर्डर सुरू होते. भारत तिबेट सीमेच्या 26 किलोमीटर आधी वसलेल्या या गावातून हिमालयातील सर्व बर्फाच्छादित शिखरे दिसतात.
10- खिनवसार– आनंद महिंद्रा यांनी शहर केलेल्या गावांच्या यादीमध्ये हे दहाव्या क्रमांकाचे गाव असून ते राजस्थान राज्याच्या नागोर जिल्ह्यात आहे. या गावाला गाव नाहीतर वाळूच्या मध्यभागी बांधलेले रिसॉर्ट म्हटले तरी वावगे ठरणार नाही अशा पद्धतीने हे गाव आहे.