स्पेशल

आता इनोव्हा घेणे परवडेल! 100% इथेनॉलवर चालणारी इनोव्हा होणार या तारखेला लॉन्च, वाचा वैशिष्ट्य आणि किंमत

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढणाऱ्या किमतींमुळे आता वाहने वापरणे देखील अतिशय खर्चाचे झालेले आहे. त्यामुळे आता दुचाकी पासून ते चार चाकी पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती अनेक मोठमोठ्या कंपन्या करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे इंधनावरील होणारा खर्च यामुळे वाचतो आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील हे खूप महत्त्वाचे आहे.

या दुहेरी फायद्यामुळे  इलेक्ट्रिक वाहने येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर धावण्याची शक्यता आहे. त्यासोबतच हायड्रोजन वर चालणाऱ्या कार देखील लाँच करण्यात आल्या असून इथेनॉल वर चालणाऱ्या कार देखील आता येणाऱ्या काळात रस्त्यावर धावताना आपल्याला दिसतील.

 100% इथेनॉल वर चालणारी इनोव्हा 29 तारखेला होणार लॉन्च

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेतच परंतु इलेक्ट्रिक कारच्या किमती देखील सर्वसामान्य व्यक्तीला परवडतील अशा नाहीत. याच अनुषंगाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा देखील प्रयत्न हा इथेनॉल वर चालणाऱ्या कार निर्मितीकडे मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. कारण बऱ्याच कार्यक्रमांमध्ये त्यांनी इथेनॉलचा उल्लेख केलेला आहे. इथेनॉलचा वापर जर सुरू झाला तर इंधनाच्या किमती कमी होतील व शेतकऱ्यांना देखील इथेनॉल निर्मितीतून पैसा मिळेल असा त्यांचा कयास आहे.

या तत्त्वाला धरून आता टोयोटाची 100% इथेनॉल वर चालणारी कार बाजारात लॉन्च होणार आहे. गेल्यावर्षी टोयोटाने हायड्रोजन वर चालणारी टोयोटा  Mirai EV लॉन्च केली होती. आता 29 ऑगस्टला 100% इथेनॉलवर चालणारी लोकप्रिय  इनोव्हा कार लॉन्च होणार आहे व या कारच्या लॉन्चिंग ची घोषणा खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच केली आहे. याविषयी एका कार्यक्रमांमध्ये बोलताना नितीन गडकरी म्हणाले होते की, 2004 मध्ये जेव्हा देशात पेट्रोलच्या किमती वाढल्या होत्या तेव्हा आपण जैवइंधनामध्ये इंटरेस्ट घेण्यास सुरुवात केली आणि त्यासाठी ब्राझीलला देखील भेट दिली होती.

या भेटीदरम्यान जैवइंधन चमत्कार करू शकते आणि पेट्रोलियमच्या आयातीवर होणारा खर्च कमी करून परकीय चलन वाचवू शकते. त्यामुळे आपल्या देशाला जर स्वावलंबी व्हायचे असेल तर ही तेल आयात शून्य करणे गरजेचे असून जी सध्या सोळा लाख कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे खूप मोठे नुकसान होत असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते व याच कार्यक्रमांमध्ये त्यांनी टोयोटाच्या इनोव्हा कारच्या जी इथेनॉल वर चालेल अशा कारच्या लॉन्चिंग ची घोषणा केली होती.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts