Interesting Fact:- बऱ्याचदा अशा काही गोष्टी असतात की त्या खूप इंटरेस्टिंग असतात व त्या आपल्यासमोर घडत असतात. परंतु आपण त्या घडतात म्हणून त्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहतो. अशा इंटरेस्टिंग गोष्टी घडण्यामागे नेमके काय कारण असते असा विचार बऱ्याच जणांच्या मनात येत नाही.
परंतु कुठलीही गोष्ट घडण्यासाठी काहीतरी कारण असतेच हे मात्र नक्की. आपण ज्या काही गोष्टी घडताना पाहतो त्या गोष्टी उगीचच न घडता त्यामागे काहीतरी कारण असते तेव्हाच त्या घडत असतात हे वास्तविक आणि वैज्ञानिक सत्य आहे. अशा पद्धतीने आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आला असेल की आपल्यासमोर एखाद्या व्यक्तीने जांभई दिली
तर त्याच वेळेस आपल्याला देखील जांभई येते. पण याचा विचार केला आहे का असं का होतं? यामागे देखील एक वैज्ञानिक कारण आहे व ते जाणून घेणे खूप महत्त्वाचा आहे. कारण याच वैज्ञानिक कारणामुळे अशा पद्धतीने क्रिया घडते.
आपल्यासमोर एखाद्याने जांभई दिली तर आपल्याला देखील त्याच वेळी जांभई का येते?
यामध्ये जेव्हा आपल्यासमोर एखाद्याने जांभई दिल्यानंतर त्याच वेळी आपल्याला देखील जांभई येते व हे असं का घडतं यामागे बरेच जण म्हणतात की बॅक्टेरियल किंवा एखाद्या व्हायरल इन्फेक्शन मुळे हे होत असेल. वैज्ञानिकांनी या गोष्टीवर अभ्यास केला आहे व त्यानंतर हे असं का घडतं याचं रियल कारण समोर आले व ते मेंदूशी संबंधित आहे.
यामध्ये इटालियन वैज्ञानिकांचा विचार पहिला तर त्यांच्यानुसार याच्या मागे एक खास न्यूरॉनचा हात आहे. यालाच मिरर न्यूरॉन असं देखील म्हटले जाते. या मिरर न्यूरॉन या नावावरून आपल्याला लक्षात येते की हे व्यक्तीची प्रति छाया तयार करतो. या न्यूरॉनचा संबंध हा कुठलीतरी नवीन गोष्ट शिकणे किंवा एखाद्याचे नक्कल करणे
आणि सहानुभूती दाखवण्याशी संबंधित आहे. या सगळ्या गोष्टींचा शोध जिया कोमो रिजोलाटी नावाच्या न्युरो बायोलॉजिस्टने लावला होता. याबाबतचा अभ्यास जेव्हा मनुष्यावर करण्यात आला तेव्हा समजून आले की न्यूरॉन तंतोतंत तेच काम करतात ते समोरची व्यक्ती करत असते. त्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीचे न्युरोन ऍक्टिव्ह होतात व त्यांना देखील तसेच काम करण्यास सांगतात.
मिरर न्यूरॉन मेंदूचे असतात चार भाग
मिरर न्यूरॉन मेंदूचे चार भाग असतात व ते म्हणजे इम्पिरियर फ्रंटल गायरस, पेराइटल लोब, सुपीरियल टेम्पोरल आणि प्री मोटर हे होय. मेंदूचे हे चारही भागांचे काम करण्याची क्षमतेवर हे न्यूरॉन आपला प्रभाव पाडत असतात.
परंतु सिझोफ्रेनिया आणि मेंदूच्या संबंधित काही आजारांमध्ये मात्र हे न्यूरॉन प्रभावित होतात व ते अगोदर सारखे प्रभावीपणे काम करू शकत नाही. यावरून आपल्याला दिसून येते की मेंदूमध्ये असलेल्या मिरर न्यूरॉनमुळे जर एखाद्या व्यक्तीने आपल्यासमोर जांभई दिली तर आपण देखील त्यावेळेस जांभई देतो.