Internet Data Saving Tips:- आजकालच्या कालावधीमध्ये आपल्याला प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसून येतो व इंटरनेटच्या मदतीने तुम्ही या स्मार्टफोनच्या मदतीने हवे ते काम अगदी चुटकीसरशी घरात बसून करू शकतात. इंटरनेटमुळे जग अगदी जवळ आले आहे असे म्हणतात व ते तितकेच खरे आहे.
परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे असे आहे की स्मार्टफोन कितीही महागडा असला परंतु त्यामध्ये डेटा किंवा इंटरनेट असल्याशिवाय कुठल्याही प्रकारचे काम आपल्याला करता येत नाही.
त्यामुळे इंटरनेट डेटा खूप महत्त्वाचा असतो. परंतु बऱ्याचदा आपण डेटा ऑन करतो आणि काही काम करायला लागतो तेव्हा आपल्याला दिसून येते की डेटा प्लान खूप लवकर संपतो किंवा दिवसाकरिता असलेला डेटाची मर्यादा लवकर संपते. या समस्येपासून जर तुम्हाला मुक्त व्हायचे असेल तर तुम्ही अगदी छोट्या डेटा सेविंग टिप्स वापरला तरी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.
या गोष्टींकडे लक्ष द्या आणि डेटा वाचवा
1- डेटा वापराचे मॉनिटरिंग करणे– स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारचे एप्लीकेशन असतात व यामध्ये काही एप्लीकेशन जास्त प्रमाणात डेटा वापरत असतात. तुमच्या फोनमधील कोणते ॲप्लिकेशन जास्त डेटा वापरतात हे शोधण्यासाठी तुम्हाला डेटा वापर मॉनिटरिंग टूल्स मदत करतात व ते तुमच्या फोन मध्येच असतात. या टूलच्या मदतीने तुम्ही जास्त प्रमाणामध्ये डेटाचा वापर करणारे एप्लीकेशन सहजपणे ओळखू शकतात व त्यांचा वापर कमी करून डेटा वाचवू शकतात.
2- बॅकग्राऊंड एप्लीकेशन बंद करणे– स्मार्टफोनमध्ये अनेक ॲप्स हे बॅकग्राऊंड मध्ये चालत राहतात व डेटाचा वापर करत राहतात. जरी तुम्ही अशा प्रकारचे एप्लीकेशन ऍक्टिव्हपणे वापरत नसाल तरी देखील ते चालू राहून डेटाचा वापर करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन बॅकग्राऊंड एप्लीकेशन बंद करू शकतो.
3- इमेजेस डाऊनलोड कमी करणे– आपल्यापैकी बरेच जण सोशल मीडिया वरून अनेक प्रकारचे इमेजेस आणि व्हिडिओ डाऊनलोड करतात. त्यामुळे देखील डेटा खूप मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. परंतु तुम्हाला इमेज डाउनलोड करणे गरजेचे असेल तर तुम्ही कमी रिझोल्युशनची निवड करावी.
4- स्ट्रीमिंग व्हिडिओची गुणवत्ता कमी करणे– आपल्यापैकी बरेच जण नेटफ्लिक्स आणि youtube सारखे व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा वापरत असतात व अशामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणावर डेटा वापरला जातो. याकरिता तुम्ही व्हिडिओची गुणवत्ता कमी करू शकतात व डेटा वाचवू शकतात.
5- ऑफलाईन मोड वापरणे– तुम्ही काही एप्लीकेशनचा वापर करताना ऑफलाइन मोड देखील वापरू शकतात. असे केल्यामुळे डेटा वापरण्याची आवश्यकता नसते व तुमचा डेटा वाचतो. उदाहरण द्यायचे झाले तर तुम्ही गुगल मॅप्स यासारखे एप्लीकेशन ऑफलाईन मोडमध्ये वापरू शकता.
6- डेटा सेविंग मोडचा वापर करणे– अनेक प्रकारच्या ॲप्समध्ये डेटा सेविंग मोड असतो व तो डेटा वापर करण्यासाठी विशेष काम करतो. त्यामुळे अशी ॲप्स वापरताना डेटा सेविंग मोड ऑन करणे गरजेचे आहे.
7- व्हिडिओ कॉल ऐवजी ऑडिओ कॉल करणे– आपल्यापैकी बऱ्याच जणांना कॉल करताना व्हिडिओ कॉल करण्याची सवय असते व अशा व्हिडिओ कॉलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर डेटा वापरला जातो. त्यामुळे तुम्हाला कुणाला कॉल करायचा असेल तर व्हिडिओ कॉल करण्याऐवजी ऑडिओ कॉल करावा. जेणेकरून डेटा वापरला जात नाही.
8- डेटा प्लानची निवड काळजीपूर्वक करावी– तुम्हाला दररोज किती डेटा आवश्यक असतो त्याप्रमाणे तुम्ही प्लान निवडावा. बऱ्याचदा आपण महागडा असा प्लान घेतो व त्या माध्यमातून आपल्याला जास्त डेटा मिळतो. परंतु तितका त्याचा वापर करत नाही. असे न करता गरजेनुसार डेटा प्लॅन निवडावा.