Special FD Scheme: गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या दोन्ही दृष्टिकोनातून जर बघितले तर बहुसंख्य गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी बँकांच्या मुदत ठेव योजनांना प्राधान्य देत असतात. हीच बाब ओळखून बँकांच्या माध्यमातून देखील अनेक प्रकारच्या विशेष एफडी योजना सादर करण्यात येतात.
या योजनेच्या माध्यमातून आकर्षक व्याजदर ऑफर व इतर गोष्टींसह ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न बँका करत असतात. अगदी याच पद्धतीने जर आपण देशातील चार प्रमुख अशा मोठ्या बँकांच्या अनुषंगाने बघितले तर या बँकांच्या विशेष मुदत ठेव योजना आहेत व यामध्ये जास्तीत जास्त व्याजदराने विशेष एफडी देत आहेत. चारही बँकांच्या या विशेष एफडीची अंतिम मुदत 30 जून 2024 पर्यंत होती व आता या योजनेसाठीची मुदतवाढ 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.
या बँकांच्या विशेष एफडी योजना आहेत फायद्याच्या
1- आयडीबीआय बँक उत्सव एफडी– आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उत्सव एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर बँकेच्या माध्यमातून यासाठीची अंतिम तारीख वाढवण्यात आलेली आहे.
आयडीबीआय बँकेच्या या एफडी योजनेत 300 दिवस, 375, 444 आणि 700 दिवसांसाठी गुंतवणूक करता येते. तीनशे दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 7.5% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.55% इतका व्याजदर मिळतो. 375 दिवसांच्या एफडी साठी व्याजदर 7.15% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.65% आहे.
2- इंडियन बँक इंड सुपर एफडी– इंडियन बँकेच्या या विशेष एफडी योजनेचे व्याजदर 300 आणि चारशे दिवसांकरिता असून 300 दिवसाच्या एफडीवर 7.05% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.55% आणि अति जेष्ठ नागरिक असतील तर त्यांचा 7.80% इतका व्याजदर मिळतो.
चारशे दिवसांची एफडी केली तर सामान्य ग्राहकांना 7.25, ज्येष्ठ नागरिकांना 7.75 आणि अति ज्येष्ठ नागरिकांना आठ टक्क्यांचा व्याजदर देण्यात येतो.
3- पंजाब अँड सिंध बँक विशेष एफडी– या बँकेच्या माध्यमातून 222 दिवसांच्या एफडीवर 7.30% आणि 333 दिवसांच्या एफडीवर 7.15 टक्के इतका व्याजदर दिला जातो. या बँकेच्या या विशेष ठेव योजनांची मुदत 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.
4- स्टेट बँकेच्या एसबीआय अमृत कलश आणि वुईकेर योजना– स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून राबवण्यात येणारी अमृत कलश योजनेची मुदत 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवली असून या एफडी योजनेअंतर्गत चारशे दिवसांच्या विशेष कालावधीचा व्याजदर 7.10%, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.60% व्याजदर दिला जातो. तसेच स्टेट बँकेची वूई केअर योजनेची अंतिम मुदत देखील आता 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.