iPhone 16 News : जगातील आघाडीची स्मार्टफोन उत्पादक कंपनीने अर्थातच एप्पलने नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपली नवीन सिरीज बाजारात लॉन्च केली आहे. iPhone 16 ही सीरीज नुकतीच लॉन्च करण्यात आली आहे. दरम्यान, जर तुम्ही आयफोनचे चाहते असाल आणि तुम्हाला तुमचा जुना आयफोन आता बदलायचा असेल आणि नवीन आयफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज समोर येत आहे.
ज्यांना iPhone 16 विकत घायचा असेल त्यांच्यासाठी मुकेश अंबानी च्या कंपनीने एक मोठी ऑफर आणली आहे. या ऑफरचा फायदा घेऊन भारतीय ग्राहकांना फक्त आणि फक्त 13000 रुपये भरून आयफोन 16 खरेदी करता येणार आहे.
खरंतर आयफोनवर Amazon, Flipkart सारख्या लोकप्रिय शॉपिंग साइटवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर सुरु असते. याशिवाय, मुकेश अंबानीच्या Reliance Digital वर सुद्धा आयफोन खरेदी वर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिला जातो.
तसेच, इतरही अनेक सुविधा तुम्हाला रिलायन्स डिजिटल च्या स्टोअर वर उपलब्ध होतात. नुकताच लाँच झालेला आयफोन १६ देखील तुम्हाला रिलायन्स डिजिटल या स्टोअरवर कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.
रिलायन्स डिजिटल स्टोअर्स वर तुम्हाला फक्त बँक डिस्काउंटचं मिळणार असे नाही तर या ठिकाणी N0-Cost EMI ची सुविधा देखील ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान आता आपण रिलायन्स डिजिटल स्टोअरवर 13,000 रुपयात आयफोन कसा खरेदी करता येणार या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कशी आहे ऑफर
एप्पल या टेक कंपनीने iPhone 16 सप्टेंबरच्या सुरुवातीला लॉन्च केला. ॲपलचा हा नवीनतम फोन आहे. अशा स्थितीत हा फोन लवकरात लवकर विकत घेण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. हा फोन रिलायन्स डिजिटलवर सुद्धा विक्रीसाठी लिस्ट करण्यात आला आहे.
iPhone 16 128GB व्हेरिएंटची किंमत 79,900 रुपये आहे. पण रिलायन्स डिजिटलवर 5,000 रुपयांची तात्काळ सूट मिळत आहे. जर तुम्ही ICICI, SBI, Kotak बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 5,000 रुपयांची तात्काळ सूट मिळणार आहे.
म्हणजे ग्राहकांना या डिस्काउंट ऑफरचा लाभ घेण्यासाठी रिलायन्स डिजिटल स्टोअर वर जाऊन आयसीआयसीआय, एसबीआय किंवा कोटक बँकेचे क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट करावे लागणार आहे. त्यानंतर फोनची किंमत 74,900 रुपये होईल. याशिवाय नो-कॉस्ट ईएमआयचाही पर्याय आहे.
तुम्ही नो कॉस्ट EMI निवडल्यास, तुम्हाला 6 महिन्यांसाठी दरमहा 12,483 रुपये द्यावे लागतील. नक्कीच जर तुमच्याकडे आयफोन १६ खरेदी करण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही तेरा हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम भरून सहा महिने नो कॉस्ट ईएमआय हा पर्याय निवडून आयफोन खरेदी करू शकणार आहात.