Upcoming IPO:- शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून 2024 हे वर्ष तसे पाहिले गेले तर काहीसे संमिश्र स्वरूपाचे राहिले. अनेकदा बाजारामध्ये चढ-उतार दिसून आले व त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान देखील झालेले आपण बघितले.
परंतु आता नवीन वर्ष 2025 ची सुरुवात झाली असून हे वर्ष आता शेअर बाजारासाठी कसे राहील? हे येणाऱ्या काळात पाहणे महत्त्वाचे ठरेल. परंतु आयपीओ च्या बाबतीत जर बघितले तर हे वर्ष आयपीओ बाजारपेठेसाठी चांगले असण्याची शक्यता आहे
कारण अनेक मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून सेबीकडे आयपीओ करिता अर्ज करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे व त्यातील जवळपास 35 पेक्षा जास्त कंपन्यांना आयपीओ लाँच करण्यासाठी सेबीची आधीच मंजुरी मिळाली आहे. त्यामध्ये काही महत्त्वाच्या कंपन्यांचे आयपीओ या मध्ये लॉन्च केले जाणार आहेत व त्याबद्दलची माहिती आपण बघू.
या वर्षात लॉन्च होतील या कंपन्यांच्या आयपीओ
1- एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया- हा आयपीओ 2025 मधील एक बहुप्रतिक्षित आयपीओ असून दक्षिण कोरियाच्या घरगुती उपकरणे उत्पादन क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीची जी काही भारतातील ब्रँच आहे ती यावर्षी आपला आयपीओ लॉन्च करणार आहे.
याकरिता सेबीकडे कंपनीने आयपीओ साठी आवश्यक मसुदा कागदपत्रे सबमिट केल्याची माहिती समोर आली असून ही कंपनी पंधरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये किमतीचे 10.01 कोटी समभाग म्हणजे शेअर्स विक्रीसाठी ऑफर करणार आहे.
2- एथर एनर्जी- इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील प्रमुख असलेली एथर एनर्जी ही कंपनी भारतीय शेअर बाजारामध्ये पदार्पण करण्याचा विचारात असून या आयपीओच्या माध्यमातून ही कंपनी नवीन शेअर्स जारी करणार आहे व त्या माध्यमातून 3100 कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
3- एचडीबी फायनान्शिअल सर्विसेस- देशातील प्रमुख असलेल्या एचडीएफसी बँकेच्या मालकीची एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस या वर्षांमध्ये नॉन बँकिंग उद्योग कंपनीद्वारे सर्वात मोठा आयपीओ लॉन्च करण्याचा विचारात असून बारा हजार पाचशे कोटी रुपयांची ऑफर कंपनीसोबत नवीन शेअर्स आणि ओएफएस यांचे मिश्रण असणार आहे. सेबीकडे मसुदा कागदपत्र कंपनीने सबमिट केले आहे.
4- एनएसडीएल- भारतातील सर्वात मोठी डिपॉझिटरी नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडचा 3000 कोटी रुपयांचा आयपीओ लॉन्च करण्यासाठी सेबीने मान्यता दिली आहे. हा आयपीओ साधारणपणे पाच कोटी 72 लाख 60 हजार एक इतक्या इक्विटी शेअर्सचा OFS असेल व या वर्षात हा आयपीओ लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.
5- विक्रम सोलर- सोलर फोटो फोटोहोल्टेइक मॉडेल विक्रम सोलर लिमिटेडने देखील प्राथमिक बाजारातून निधी उभारण्यासाठी आवश्यक ते मसुदा कागदपत्रे दाखल केले आहेत. हा आयपीओ पंधराशे कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स आणि 17.45 दशलक्ष इक्विटी शेअर्सचे OFS मिश्रण आहे.
6- टाटा कॅपिटल- टाटा समूहाची वित्त सेवा शाखा टाटा कॅपिटल सप्टेंबर 2025 पर्यंत शेअर बाजारात लिस्ट होण्याची तयारी करत आहे. टाटा मोटर्स फायनान्समध्ये चालू असलेली विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला याबाबतचे मसुदा कागदपत्रे दाखल करण्यासाठीची प्रक्रिया सुरू होईल अशी एक शक्यता आहे.
7- हिरो फिनकॉर्प- यावर्षी 3368 कोटी रुपयांचा हिरो फिनकॉर्प आयपीओ येणार आहे. ही कंपनी हिरो मोटोकॉर्पची वित्तपुरवठा करणारी शाखा असून या कंपनीला तिच्यावर असलेले कर्ज कमी करण्याकरिता आणि व्यवसायाची वाढ करता यावी म्हणून आयपीओच्या माध्यमातून निधी उभा करायचा आहे.