ITBP Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. ही गुड न्यूज समोर येतेय ती ITBP म्हणजे इंडो तिबेट पोलीस दलातून. आयटीबीपीने म्हणजेच इंडो तिबेट पोलीस दलाने काही रिक्त पदाच्या भरतीसाठी नुकतीच एक अधिसूचना काढली आहे.
या भरतीच्या माध्यमातून या रिक्त पदाच्या दहा जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड थेट मुलाखत घेऊन केली जाणार आहे आणि निवड झालेल्या उमेदवाराला 85,000 पर्यंतचा पगार मिळणार आहे. दरम्यान आज आपण आयटीबीपीने काढलेल्या या भरती संदर्भात आवश्यक सर्व माहिती थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या आणि किती रिक्त पदांसाठी आयोजित झाली भरती
ITBP ने ही भरती काढली आहे. यासाठीची अधिसूचना देखील आयटीबीपी ने प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेनुसार आयटीबीपी मध्ये तज्ञ डॉक्टर या रिक्त पदाच्या दहा जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी ग्रहण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच अनुभव असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य मिळणार आहे. शैक्षणिक पात्रते संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांना मात्र एकदा अधिसूचना वाचावी लागणार आहे.
अर्ज कुठे करावा लागणार?
यासाठी इच्छुक व्यक्तींना आयटीबीपीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करायचा आहे. itbpolice.nic.in या लिंक वर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज सादर करू शकणार आहेत.
निवड प्रक्रिया कशी राहणार?
या पदासाठी उमेदवाराची निवड थेट मुलाखत घेऊन केली जाणार आहे. यासाठी कोणत्याच लेखी परीक्षेची तरतूद आयटीबीपी च्या माध्यमातून करण्यात आलेली नाही.
मुलाखत केव्हा अन कुठे होणार ?
आयटीबीपी ने अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे या पदासाठीची मुलाखत 24 ते 26 एप्रिल दरम्यान सकाळी नऊ वाजेपासून सुरू होणार आहे. मुलाखत ही आयटीबीपी ने नियुक्त केलेल्या केंद्रावर होईल याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
पगार काय राहील बरं?
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 85 हजार रुपये प्रति महिना इतक वेतन मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवारांची निवड मात्र कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने होणार आहे याची देखील दखल घ्यायची आहे.