स्पेशल

Jio ने आणला स्पेशल दिवाळी रिचार्ज ! एकदाच रिचार्ज करा व 388 दिवस अनलिमिटेड कॉल,5G नेट अन भरपूर सर्व्हिस मिळवा

Jio Special Recharge : सध्या दिवाळीचा हंगाम आहे. दिवाळी जवळ येत असल्याने अनेक कंपन्या नवनवीन ऑफर देतात जेणे करून कस्टमर आपल्याशी जोडला जाईल. या दिवाळीला देखील अनेक कंपन्या दिवाळीसाठी आपल्या ग्राहकांसाठी उत्तम ऑफर्स घेऊन येत आहेत.

ऑफलाइन मार्केट आणि ऑनलाइन मार्केटमध्येही विविध डिस्काऊंट ऑफर्स सुरु आहेत. आता रिलायन्स जिओनेही आपल्या ग्राहकांसाठी एक शानदार ऑफर आणली आहे. जिओने आपल्या रिचार्ज प्लान लिस्टमध्ये एक शानदार प्लॅन जोडला आहे. या प्लॅनमध्ये दिवाळी ऑफर अंतर्गत जिओ आपल्या ग्राहकांना 900GB डेटा देत आहे, तर 23 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळते.

2999 रुपयांचा रिचार्ज प्लान

रिलायन्स जिओचा 2,999 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन युजर्संना संपूर्ण वर्षासाठी म्हणजेच 365 दिवसांसाठी रिचार्ज करण्याच्या त्रासातून मुक्ती देतो. म्हणजे वर्षभर रिचार्ज कारण्यासाची झंजट संपून जाते. यात 23 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळते.

या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटा मिळेल. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100SMS मिळतात. इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाले तर युजर्संना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचे सब्सक्रिप्शन मिळते. या प्लॅनमध्ये एकूण 900GB डेटा मिळतो. विशेष म्हणजे जर तुम्ही 5G कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात राहत असाल तर त्या सदस्यांना अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ घेता येईल.

MyJio अॅपद्वारे रिचार्ज करू शकता

ग्राहक या जिओ दिवाळी ऑफरला मायजिओ अॅपवरील सध्याच्या कॅशबॅक ऑफर्ससोबत जोडून त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतात. मात्र जिओकडून हे स्पष्ट झालेले नाही की ही दिवाळी रिचार्ज ऑफर फक्त मायजिओ अॅपवर लागू आहे की ग्राहक ऑफरचा लाभ घेण्यासाठी इतर यूपीआय अॅप्सचा वापर करू शकतात. मात्र, सध्या पेटीएमसारख्या प्लॅटफॉर्मवर हा पर्याय दिसत नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts