Job Update: सध्या शासनाच्या माध्यमातून विविध भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून अनेक दिवसांपासून रखडलेल्या किंवा स्थगित करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेला आता वेग आलेला आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून देखील अनेक भरती प्रक्रिया सुरू आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर 17 ऑगस्ट पासून तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे व नुकतीच वनरक्षक पदासाठी ची भरती प्रक्रिया संपली आहे.
तसेच विविध जिल्हा परिषद अंतर्गत देखील भरती प्रक्रियेची अर्ज प्रक्रिया 25 ऑगस्ट रोजी संपलेली आहे. त्यामुळे परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना खूप मोठी सुवर्णसंधी आहे. सध्या अशीच पद्धतीची नोकरीची सुवर्णसंधी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये देखील चालून आले असून यामध्ये विविध पदांच्या भरती करिता अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये 312 पदांसाठी भरती
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांच्या भरती करता अधिसूचना जारी करण्यात आली असून यामध्ये पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये एकूण 312 विविध रिक्त पदे आहेत.
पदाचे नाव आणि रिक्त संख्या
या भरतीच्या माध्यमातून यांत्रिक अभियंता 57 जागा, इलेक्ट्रिक इंजिनिअर 16 जागा, इन्स्ट्रुमेंटेशन अभियंता 36 जागा, स्थापत्य अभियंता 18 जागा, रासायनिक अभियंता 43 जागा, वरिष्ठ अधिकारी( शहरी गॅस वितरण संचालन आणि देखभाल ) दहा जागा, वरिष्ठ अधिकारी( एलएनजी व्यवसाय) दोन जागा, वरिष्ठ अधिकारी/ सहाय्यक व्यवस्थापक( जैवइंधन प्लांट ऑपरेशन्स) 1 जागा, वरिष्ठ अधिकारी/ सहाय्यक व्यवस्थापक( सीबीजी प्लांट ऑपरेशन्स) एक जागा,
वरिष्ठ अधिकारी- विक्री( किरकोळ / थेट विक्री/ एलपीजी) तीस जागा, वरिष्ठ अधिकारी/ सहाय्यक व्यवस्थापक( गैर इंधन व्यवसाय ) चार जागा, वरिष्ठ अधिकारी( ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसाय) दोन जागा, अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी( मुंबई रिफायनरी) दोन जागा, अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी( विशाख रिफायनरी) सहा जागा,
गुणवत्ता नियंत्रक( क्यू सी ) अधिकारी नऊ जागा, चार्टर्ड अकाउंटंट 16 जागा, कायदा अधिकारी पाच जागा, कायदा अधिकारी( एच आर )दोन जागा, वैद्यकीय अधिकारी चार जागा, महाव्यवस्थापक( कंपनी सचिव – एक कल्याण अधिकारी- मुंबई रिफायनरी एक जागा आणि माहिती प्रणाली( आयएस)अधिकारी दहा जागा
या भरती करता लागणारे शुल्क
या सर्व पदांकरिता अर्जाचे शुल्क हे अनारक्षित, इतर मागासवर्गीय आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील उमेदवारांना भरणे गरजेचे आहे. उमेदवारांना 1180 रुपये फीज भरावी लागणार आहे. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क यामध्ये लागणार नाही.
निवड झाल्यास किती मिळेल वेतन?
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 50 हजार ते दोन लाख 80 हजार रुपयांपर्यंत वेतन मिळेल.
यासाठी निवड कशी केली जाईल?
यामध्ये उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल व ज्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल त्यांना कॅम्पुटर बेस्ड टेस्ट, ग्रुप टास्क, पर्सनल इंटरव्यू, मूट कोर्ट( केवळ लॉ ऑफिसर्स आणि लॉ ऑफिसर्स एच आर) इत्यादी करिता बोलावले जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत
ज्या उमेदवारांना याकरिता अर्ज करायचा आहे असे उमेदवार hindustanpetroleum.com या संकेतस्थळावर जावे व त्या ठिकाणी करिअर ऑप्शनवर नोकरीची संधी निवडावी लागेल.. त्यानंतर वर्तमान ओपनिंग या पर्यायावर जावे लागेल व त्याकरिता अधिकारी भरतीसाठी जाऊन अर्ज करावा लागतो.
या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला साइन इन करावे लागेल व नोंदणी करा विनंती केलेले तपशील भरा आणि कागदपत्रे अपलोड करा इत्यादी पायऱ्यांनी हा अर्ज पूर्ण करावा लागेल. कागदपत्र अपलोड केल्यानंतर फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट आऊट घेणे गरजेचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 असून यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता करिता उमेदवारांनी जाहिरात पहावी.