Joint Home Loan Benefits : घर बनवण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आपल्या स्वप्नातील घरात उर्वरित आयुष्य मनमुरादपणे जगता यावे यासाठी अनेक जण मोठ्या कष्टाने घराची निर्मिती करत असतात. अलीकडे मात्र घराचे स्वप्न पूर्ण करणे थोडेसे आव्हानात्मक झाले आहे.
घराच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याने आता सर्वसामान्यांना घर बनवताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकजण स्वप्नाच्या घरनिर्मितीसाठी आता होम लोनचा सहारा घेत आहेत. विशेष म्हणजे जाणकार लोक देखील होम लोन घेऊन घराची निर्मिती करण्यास काहीही हरकत नाही असे मत व्यक्त करत आहेत.
घर बनवणे ही आयुष्यातील एक मोठी अचिव्हमेंट असते. त्यासाठी मोठा पैसा देखील खर्च करावा लागतो. त्यामुळे घर बनवताना विशेष काळजी घेतली जाते. होम लोन अर्थातच गृह कर्ज घेताना देखील विशेष काळजी घ्यावी लागते.
गृह कर्ज घेताना ज्या बँका कमी व्याजदरात हे कर्ज उपलब्ध करून देतात त्यांच्याकडून कर्ज घेणे फायदेशीर ठरते. याशिवाय गृह कर्ज घेताना पत्नीच्या नावाने जॉईंट होम लोन घेतले पाहिजे असा सल्ला तज्ञांच्या माध्यमातून दिला जातो. पत्नीच्या नावाने जॉईंट होम लोन घेतल्यास अनेक फायदे मिळतात.
दरम्यान आज आपण याच बाबत तज्ञ लोकांनी दिलेल्या महत्वपूर्ण माहिती विषयी जाणून घेणार आहोत. गोदरेज कॅपिटलचे मुख्य ग्राहक अधिकारी नलिन जैन म्हणाले की, जॉइंट होम लोनच्या मदतीने घर घेण्याचे अनेक फायदे आहेत.
जर तुम्ही तुमच्या पत्नीला सह-अर्जदार किंवा सह-मालक बनवले तर तुम्हाला बरेच फायदे मिळतात. विशेषत: पत्नी नोकरी करत असेल तर पत्नीच्या नावे घेतलेल्या जॉईंट होम लोनचे फायदे वाढतात.
जॉईंट होम लोन घेण्याचे फायदे खालील प्रमाणे
जर तुमची पत्नी नोकरी करत असेल आणि तुम्ही तिला सहअर्जदार बनवून गृहकर्ज घेतले तर तुम्हाला अनेक फायदे मिळतात. नोकरीला असलेल्या पत्नीला सहअर्जदार बनवून गृहकर्ज घेतले तर कर्ज मिळण्याची पात्रता वाढते. त्याचे कारण म्हणजे उत्पन्नाचा आधार वाढतो. जर दोघांचे CIBIL मजबूत असेल तर बँकेकडून कमी व्याजदरात कर्ज मिळते. याशिवाय कर्जाची रक्कमही वाढू शकते.
बँका महिलांना कमी व्याजदरात गृहकर्ज देतात. यामुळे जर पत्नीला सह अर्जदार बनवले तर कमी व्याजदरात कर्ज मिळते.
कर्ज प्रस्तावात सह-अर्जदाराचा उल्लेख असल्यास बँका सहजपणे कर्ज देतात. वास्तविक, अशा प्रकारच्या कर्जामध्ये जोखीम कमी होते. एकट्या अर्जदाराच्या बाबतीत, बँक पडताळणी आणि प्रक्रियेसाठी थोडा जास्त वेळ घेते. पण जर सहअर्जदार असेल तर कर्ज मंजूर होण्यास कमी कालावधी लागतो.
जर तुमची पत्नी सह-अर्जदारासोबत सह-मालक असेल, तर कर लाभ देखील दुप्पट मिळतो. गृहकर्जाच्या प्रीपेमेंटवर, कलम 24 अंतर्गत व्याजाच्या भागावर 2 लाख रुपयांचा कर लाभ उपलब्ध आहे. मूळ रकमेच्या परतफेडीवर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांचा कर लाभ उपलब्ध आहे. अशा प्रकारे एकूण लाभ 3.5 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. जर पत्नी सह-मालक असेल तर दोघांनाही हा लाभ मिळेल आणि निव्वळ कर लाभ 7 लाख रुपयांचा होईल.
सह-मालकीचे फायदे मिळविण्यासाठी, पत्नीला EMI देखील भरावा लागणार आहे. जर पत्नी 50 टक्के संपत्तीच्या मालकीण असेल, तर तिला देखील अर्धा EMI भरावा लागणार आहे.