स्पेशल

ब्रेकिंग ! कल्याण-मुरबाड रेल्वेचा मार्ग बदलला; आता ‘या’ नवीन मार्गाने धावणार रेल्वे

Kalyan Murbad Railway : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे विभागाला मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी देखील या केंद्रीय अर्थसंकल्पात हजारो कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील प्रलंबित रेल्वे मार्ग आता लवकरात लवकर मूर्त रूप घेतील असा आशावाद देखील तज्ञांनी व्यक्त केला आहे.

अशातच कल्याण मुरबाड बहूचर्चीत रेल्वे मार्गाबाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की कल्याण मुरबाड हा 28 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. मात्र या यंदाच्या अर्थसंकल्पात या रेल्वेमार्गासाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. यामुळे हा बहुचर्चित रेल्वे मार्ग लवकर मृतरूप घेणार आहे.

वास्तविक कल्याण मुरबाड रेल्वे मार्ग उल्हासनगर मार्गे प्रस्तावित करण्यात आला आणि उल्हासनगर मार्गे प्रस्तावित करण्यात आलेल्या रेल्वे मार्गासाठीच यंदाच्या अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद देखील झाली. मात्र आता या रेल्वे मार्गात बदल करण्यात आला आहे. हा रेल्वे मार्ग आता उल्हासनगर मार्गे जाणार नसून आंबिवली मार्गे प्रस्तावित करण्यात आला आहे.

अर्थसंकल्पात जरी उल्हासनगर मार्गे प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद झाली असली तरी देखील अर्थसंकल्प पास झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात या रेल्वे मार्गाचा रूट बदलण्यात आला आहे. आता हा रेल्वे मार्ग प्रकल्प आंबिवली टिटवाळा मार्गे तयार केला जाणार आहे. विशेष बाब म्हणजे या संबंधित पत्र रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पाठवण्यात आले आहे. यामुळे आता कल्याण मुरबाड रेल्वे उल्हासनगर मार्गे न जाता आंबिवली टिटवाळा मार्गे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पाबाबत थोडक्यात

हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. रेल्वे मार्ग लवकरात लवकर बांधून तयार करून प्रवाशांच्या सेवेत दाखल करावा अशी मागणी वारंवार करण्यात आली. दरम्यान या 836.12 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली. यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटींची तरतूद झाली. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडून जाहीर केलेल्या ब्लूबूकमध्ये उल्हासनगर मार्गे ही रेल्वे जाईल अशी नोंद देखील करण्यात आली आहे. मात्र 3 फेब्रुवारी रोजी या रेल्वे मार्गात बदल करण्यात आला. कल्याण मुरबाड रेल्वे आता आंबिवली मार्गे नेण्याची मंजुरी देण्यात आली. म्हणजेच आता कल्याण-आंबिवली-टिटवाळा-मुरबाड अशा मार्गाने हा रेल्वे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.

कल्याण मुरबाड रेल्वे सुरुवातीला आंबिवली मार्गेच प्रस्तावित करण्यात आली होती. कल्याण-मुरबाड ही रेल्वे मार्गिका टिटवाळा मार्गे करण्याचा प्रस्ताव हा २०१६-१७मध्ये तयार करण्यात आला होता. या 2017 मध्ये सादर झालेल्या प्रस्तावानुसार, या मार्गात कल्याण, शहाड, आंबिवलीनंतर टिटवाळा, घोटसई, पोटगाव, किशोर आणि मुरबाड ही रेल्वे स्थानके येत होती. विशेष बाब म्हणजे त्यावेळी या रेल्वे मार्गाचा सर्वेक्षणाचा नकाशाही तयार करण्यात आला होता.

मात्र सुरुवातीला प्रस्तावित करण्यात आलेल्या या मार्गात मोठा बदल करण्यात आला. मार्च २०१९ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रकल्प आंबिवली टिटवाळा मार्गे न जाता उल्हासनगरमार्गे तयार करण्याचा प्रस्ताव तयार झाला. विशेष म्हणजे उल्हासनगर मार्गे कल्याण मुरबाड रेल्वेचं भूमिपूजन देखील झालं.

दरम्यान याच प्रस्तावाला यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली. मात्र या प्रकल्पाला निधी प्राप्त झाल्यानंतर प्रकल्पाचा मार्ग पुन्हा बदलण्यात आला असून हा प्रस्ताव सादर करताना जो जुना मार्ग तयार झाला होता त्याच मार्गाने आता कल्याण मुरबाड रेल्वे धावणार आहे. म्हणजेच कल्याण मुरुबाड रेल्वे आता आंबिवली टिटवाळा मार्गे जाणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts