Kanda Anudan 2023 : लेट खरीप हंगामातील लाल कांद्याला खूपच कमी भाव मिळाला होता. विशेषतः फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांद्याला अगदी रद्दी पेक्षा कमी भाव मिळत होता. यामुळे अनेक शेतकरी संघटना आक्रमक झाल्या.
शेतकऱ्यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार शासनाने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लेट खरीप हंगामातील लाल कांद्यासाठी 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान 200 क्विंटल च्या मर्यादेत जाहीर केले.
यासाठी 30 एप्रिल 2023 पर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना संबंधित बाजार समितीमध्ये अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यानुसार राज्यातील कांदा उत्पादकांनी आपला अर्ज बाजार समितीमध्ये सादर केला आहे.
हे पण वाचा :- ठरलं ! महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या वाढणार; तुम्ही कोणत्या जिल्ह्यात जाणार? नवीन जिल्ह्याची यादी, पहा…
अर्ज सादर झाला असल्याने आता अनुदान केव्हा येईल अशी विचारणा शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे. दरम्यान सांगली बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी देखील आपला अनुदान अर्ज बाजार समितीकडे दाखल केला आहे.
बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार, एपीएमसीमध्ये जवळपास 3950 शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी अर्ज सादर केला आहे. सध्या शेतकऱ्यांनी सादर केलेले अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरले जात आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सांगली बाजार समितीमध्ये नगर, पुणे, सोलापूर, सातारा, धाराशिव, नाशिक या जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणत असतात. हेच कारण आहे की सादर झालेल्या अर्जांमध्ये सांगली जिल्ह्यातील अर्ज फक्त दोन टक्के आहेत.
हे पण वाचा :- वंदे भारत एक्सप्रेस पाठोपाठ आता देशात वंदे भारत इलेक्ट्रॉनिक व्हेईकलही धावणार सुसाट; किंमत अन विशेषता आहेत खूपच खास, पहा….
उर्वरित अर्ज हे इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आहेत. दरम्यान शेतकऱ्यांनी सादर केलेल्या अर्जाची ऑनलाईन माहिती भरली जात आहे. बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे ही ऑनलाईन माहिती आगामी तीन दिवसात भरले जाणार आहे. नंतर याचा सविस्तर अहवाल शासनाकडे सुपूर्द केला जाणार आहे.
शासनाकडे अहवाल सादर झाल्यानंतर मग संबंधित पात्र कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या खात्यावर कांदा अनुदानाचा पैसा वर्ग केला जाणार आहे. एकंदरीत कांदा अनुदानाचा पैसा येत्या काही दिवसात संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे काम सुरू होणार आहे.
हे पण वाचा :- पुणे जिल्ह्याचे विभाजन होणार? ‘या’ 8 तालुक्याचा तयार होणार नवीन शिवनेरी जिल्हा, तालुक्याची आणि गावांची यादी पहा एका क्लिकवर