Kanda Anudan Dada Bhuse : गेल्या काही महिन्यांपासून कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत आहे. यामुळे राज्यभरातील कांदा उत्पादक संकटात सापडले आहेत. पुन्हा एकदा कांद्याने शेतकऱ्यांना दगा दिला आहे. एकीकडे कांद्याला कवडीमोल दर मिळत आहे तर दुसरीकडे अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेला अवकाळी पावसाने अन गारपीटीमुळे रब्बी हंगामातील काढणी योग्य पिकांची मोठी हानी झाली आहे. यामुळे शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दाराने आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्यांना निसर्गाच्या दुष्टचक्राने देखील जेरीस आणलं आहे. दरम्यान कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल बाजारभावामुळे कांद्याला अनुदान मिळावं अशी मागणी शेतकऱ्यांची होती.
यासाठी शेतकरी संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे निवेदने देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शासनाने कांदा सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. सुरुवातीला तीनशे रुपये प्रति क्विंटल इतकं कांदा सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला होता.
हे पण वाचा :- आता नवीन वाद पेटणार ! समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात 1000 कोटींचा घोटाळा?; राज्यात एकच खळखळ
मात्र हे तुटपुंज सानुग्रह अनुदान देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मलम लावण्याचे काम होत आहे की जखमेवर मीठ चोळण्याचे काम असा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित झाला होता. विरोधकांनी देखील विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित करत कांदासानुग्रह अनुदानात वाढ करण्याची मागणी केली होती.
विरोधकांच्या माध्यमातून तसेच शेतकरी संघटनांच्या माध्यमातून कांदा अनुदान किमान 500 रुपये प्रति क्विंटल इतकं मिळावे अशी मागणी जोर धरत होती. या पार्श्वभूमीवर मग शासनाने आपल्या आधीच्या अनुदानाच्या निर्णयामध्ये फेरबदल केला आणि सानुग्रह अनुदान 350 रुपये प्रतिक्विंटल इतका कांदा उत्पादकांना दिले जाईल असा मोठा निर्णय घेतला.
350 रुपये प्रति क्विंटल इतका अनुदान दिले जाईल अशी घोषणा झाली खरी मात्र आता घोषणा देऊन जवळपास एक ते दोन आठवड्याचा काळ उलटला आहे. तरी देखील या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे कांदा अनुदान नेमकं मिळणार केव्हा हाच मोठा प्रश्न शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! पाच वर्षांपासून बंद असलेला ‘हा’ पूल ‘या’ दिवशी पुन्हा सुरु होणार,…
दरम्यान आता राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात एक मोठी माहिती दिली आहे. भुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा सानुग्रह अनुदान तातडीने देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
आता एप्रिल महिन्यात प्रत्यक्षात कांदा उत्पादकांना अनुदान दिले जाईल असे आश्वासन भुसे यांनी दिल आहे. निश्चितच, एप्रिल महिन्यात 350 रुपये प्रतिक्विंटल इतकं कांदा अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना संकटाच्या काळात दिलासा मिळणार आहे. मात्र मिळणार आहे अनुदान शेतकऱ्यांच्या अपेक्षा एवढं नाही.
शेतकऱ्यांच्या मते कांदा उत्पादित करण्यासाठी येणारा खर्च पाहता हे अनुदान खूपच नगण्य आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसले असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, देवळा मधील वाजगाव येथे एका कृषी पर्यटन केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी भुसे यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळी भुसे यांनी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, शेतकऱ्यांनी चिंता करू नये असे देखील मत व्यक्त केले आहे.
हे पण वाचा :- द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! विकसित झालं द्राक्षाचे नवीन वाण; ‘हे’ आहेत याचे वैशिष्ट्ये