Rain Predicts:- महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये जर बघितले तर सध्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर महाराष्ट्रामध्ये सध्या विदर्भ व मराठवाड्यात जोरदार पाऊस बरसत असून राज्यांमध्ये देखील पावसाने कहर केल्याचे चित्र आहे.
जर आपण या हंगामामधील एकंदरीत पावसाची सरासरी पाहिली तर भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार काही राज्यांमध्ये सरासरीपेक्षा 66% पेक्षा जास्त पाऊस झाल्याची स्थिती आहे व त्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत.
ऑगस्ट महिन्यामध्ये देशात सरासरीपेक्षा 15.3 टक्के जास्त पावसाची नोंद करण्यात आलेली आहे व सध्या सप्टेंबर महिना सुरू असून हा पावसाचा शेवटचा टप्पा किंवा शेवटचा कालावधी समजला जातो.
परंतु आता खरी मेख इथेच असून या महिन्यापासूनच परतीच्या पावसाच्या आता नेमकी काय स्थिती राहू शकते हे पाहणे गरजेचे राहणार आहे व यावरच आता खरीप हंगामातील पिकांची स्थिती काय राहील? हे ठरणार आहे.
हवामान शास्त्र विभागाच्या महासंचालकांनी वर्तवलेला अंदाज
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महोपात्रा यांनी याबाबत म्हटले आहे की,संपूर्ण देशांमध्ये सप्टेंबर महिन्यात दीर्घकालीन सरासरीच्या तब्बल 109 टक्के पाऊस होईल व इतकेच नाही तर सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची दाट शक्यता असून त्यामुळे परतीचा पाऊस लांबेल असा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे.
जर आपण एकंदरीत परिस्थिती पाहिली तर परतीच्या प्रवासाची सुरुवात ही सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात सुरू होते व आक्टोंबर महिन्याच्या साधारण मध्यापर्यंत मान्सून पूर्णपणे माघारी फिरतो. परंतु यावर्षी मान्सूनचा हा जो काही परतीच्या प्रवासाचा कालावधी आहे त्यामध्ये काहीसे बदल होण्याची चिन्हे आहेत.
कारण ला नीनाची स्थिती ऑक्टोबर महिन्यामध्ये विकसित होण्याची एक शक्यता असून ही स्थिती मान्सूनच्या एकंदरीत संपूर्ण प्रवासावर खूप मोठा परिणाम करत असते. ला निना स्थिती सप्टेंबरमध्ये जर विकसित झाली तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जास्त प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस झाला तर…
खरीप हंगामातील जर पिकांची स्थिती बघितली तर साधारणपणे या कालावधीत खरीप पिकांची काढणी केली जाते. त्यामुळे जर सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरी पेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाला तर नक्कीच काढणीला आलेल्या पिकांना याचा खूप मोठा फटका बसून त्यांचे नुकसान होऊ शकते व उत्पादनाला फटका बसू शकतो.
सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त पावसाचा परिणाम हा सोयाबीन, कापूस तसेच मका व कडधान्य वर्गातील पिकांवर मोठ्या प्रमाणावर दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका देखील बसू शकतो.
म्हणजेच हवामान विभागाचा सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यातील जास्त पावसाचा अंदाज खरा ठरला तर मात्र पिकांना खूप मोठा फटका बसून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टिकोनातून खूप मोठे नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे.