स्पेशल

पुणे, कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी ! कोकण रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; पहा….

Konkan Railway News : सालाबादाप्रमाणे यंदा देखील कोकण रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विशेष गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. आपल्या विविध मार्गांवर कोकण रेल्वेच्या माध्यमातून उन्हाळी सुट्ट्यांसाठी विशेष स्पेशल ट्रेन चालवल्या जात आहेत. दरम्यान आतापर्यंत कोकण रेल्वेच्या माध्यमातून चार स्पेशल गाड्या सुरू करण्यात आल्या असून यामध्ये आणखी दोन नवीन स्पेशल गाड्यांची भर घालण्यात आली आहे.

साहजिकच कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास सुलभ आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी आणि पुणे ते एर्नाकुलम या मार्गावर धावणाऱ्या दोन स्पेशल गाड्या काही ठराविक कालावधीसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी ही गाडी 15 एप्रिल ते तीन जून दरम्यान सुरू राहणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ शेतकऱ्यांना विहिरीसाठी अडीच लाख अन शेततळ्यासाठी 1 लाख रुपये अनुदान मिळणार; तुम्हाला लाभ मिळणार का? पहा…..

ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून विहित कालावधीसाठी दर शनिवारी रात्री १ वाजून १० मिनिटांनी रवाना होणार असून दुसऱ्या दिवशी २ वाजून ३५ मिनिटांनी करमाळी स्थानकात पोहोचणार आहे. तसेच करमाळा येथून ही गाडी दर शनिवारी सायंकाळी ४:२० मिनिटांनी रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचणार आहे.

ही ट्रेन 15 एप्रिल ते 3 जून पर्यंतच धावणार आहे यानंतर ही ट्रेन बंद केली जाणार आहे. निश्चितच सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने हा निर्णय घेतला असून यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच पुणे ते एर्नाकुलम ही ट्रेन 15 एप्रिल ते २५ मे दरम्यान सुरू राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते एर्नाकुलम ही गाडी पुणे येथून दर गुरुवारी सायंकाळी ६:४५ वाजता निघणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ती सायंकाळी ६:५० वाजता एर्नाकुलमला पोहोचणार आहे.

हे पण वाचा :- साताऱ्याच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! कलिंगडच्या पिकातून दोन महिन्यात कमवले 6 लाख, परिसरात रंगली एकच चर्चा

कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टला दिलेल्या माहितीनुसार, पुणे ते एर्नाकुलम गाडी लोणावळा, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, कुंदापुरा, उडुपी, मंगळुरू जंक्शन, कासरगोड, कन्नूर, थलास्सेरी, कोझिकोडे, तिरूर, शोरनूर जंक्शन या ठिकाणी थांबा घेणार आहे.

निश्चितच कोकण रेल्वेचा हा निर्णय प्रवासासाठी फायद्याचा असून यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावाकडे जाणाऱ्या तसेच रोजाना प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. मात्र या विशेष गाड्या ठराविक कालावधीसाठी धावणार असून या ठराविक कालावधीनंतर या गाड्या रद्द केल्या जातील असे देखील रेल्वेच्या माध्यमातून सांगितल गेल आहे.

हे पण वाचा :- शिंदे सरकारच कर्मचाऱ्यांना गिफ्ट ! जुनी पेन्शन योजनेबाबत घेतला ‘हा’ निर्णय, पहा…..

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts