Ladki Bahin Yojana And Annapurna Yojana : नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेश मध्ये भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीला मोठा फटका बसला. खरे तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यात भारतीय जनता पक्ष खूपच ताकतवर आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये या दोन्ही राज्यांमध्ये बीजेपीने चांगली चमकदार कामगिरी केलेली होती.
यामुळे लोकसभा निवडणुकीत या राज्यांमध्ये चांगले यश मिळणार असे साऱ्यांनाच वाटत होते. कदाचित विरोधकांना देखील बीजेपी या राज्यांमध्ये चांगली कामगिरी करणारं अशी जाणीव असावी. पण, जेव्हा लोकसभा निवडणुकीचा रिझल्ट आला तेव्हा बीजेपी ची पायाखालची जमीन सरकली.
कारण की महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये बीजेपीच्या जागा मोठ्या प्रमाणात कमी झाल्यात. महाराष्ट्रातील महायुतीला लोकसभा निवडणुकीत फारच मोठा फटका बसला. दरम्यान आता राज्यात विधानसभा निवडणुका लागणार आहेत. येत्या काही दिवसांनी भारतीय निवडणूक आयोग राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे.
अशा या परिस्थितीत आणि लोकसभा निवडणुकीतून धडा घेत राज्यातील महायुती सरकारने सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली आहे. सर्वसामान्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यात आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा आर्थिक लाभ प्रत्यक्षात पात्र लाभार्थ्यांच्या महिलांच्या बँक अकाउंट मध्ये जमा करण्यात आला आहे. दरम्यान आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आणखी एक गुड न्यूज समोर येत आहे. खरे तर लाडकी बहीण योजनेसोबतच राज्यातील महिलांसाठी शिंदे सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची देखील घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. अशा परिस्थितीत आता आपण या योजनेचे स्वरूप आणि या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे आहे योजनेचे स्वरूप?
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. घरगुती गॅस सिलेंडर म्हणजे 14.2 किलो वजनीचे गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. सरकारकडून एका वर्षात तीन गॅस सिलेंडरचे पैसे अनुदान म्हणून पात्र लाभार्थ्यांच्या बँक अकाउंट मध्ये वर्ग केले जाणार आहेत.
कोणाला मिळणार लाभ?
या योजनेचा लाभ सर्वच महिलांना दिला जाणार नाही. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या आणि उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. मात्र यासाठी पात्र महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे.
ज्या महिलांच्या नावाने गॅस कनेक्शन नसेल त्या महिलांना पात्र असूनही याचा लाभ मिळणार नाही याची नोंद घ्यायची आहे. तसेच एका कुटुंबातील एकाच महिलेला याचा लाभ मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका वर्षात फक्त तीन गॅस सिलेंडर साठी अनुदान मिळणार आहे अर्थातच 3 गॅस सिलेंडर मोफत भरून मिळणार आहेत.