Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळालेले आहेत. आता या योजनेच्या पात्र महिलांच्या माध्यमातून पुढील सप्टेंबर महिन्याच्या पैशांची वाट पाहिली जात आहे. दरम्यान याच संदर्भात सरकारच्या माध्यमातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहिण योजनेचा पुढील हफ्ता म्हणजेच तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू झाली आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
या योजनेसाठी राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र ठरणार आहेत. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिला याच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत. याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या महिलांना दिला जाणार आहे.
तथापि ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिला देखील याच्या लाभासाठी पात्र ठरतील.
या योजनेसाठी सुरुवातीला 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार होते, मात्र या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता अन असंख्य महिलांचे अर्ज भरणे बाकी असल्याने अर्ज भरण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. राज्यातील असंख्य महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळालेले आहेत.
दरम्यान आता या योजनेचा तिसरा हप्ता देखील 29 सप्टेंबरला पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधी अर्ज केले आहे आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे 4500 रुपये दिले जाणार आहेत.
मात्र ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये अर्ज केला आहे त्या महिलांना फक्त सप्टेंबर चे पैसे मिळणार आहेत. तसेच ज्यांना आधीचं दोन महिन्यांचे पैसे मिळाले आहेत त्यांनाही फक्त सप्टेंबरचेचं पैसे मिळणार आहेत. अशातच मात्र सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ३६ हजार महिलांच्या बँक खात्याला आधारलिंक नाही. त्यांना आता बँक खात्याशी आधारलिंक केल्याशिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
२९ सप्टेंबरपूर्वी संबंधित बँकेत जाऊन त्या अर्जदार महिलांना खात्याला आधारलिंक करून घ्यावे लागणार आहे. त्यांची यादी राज्यस्तरावरून जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. ज्यांनी योजनेच्या सुरवातीला अर्ज केलाय पण अद्याप लाभ मिळालेला नाही, अशा त्या महिला आहेत.
यामुळे जर तुमचेही बँक अकाउंट आधार सोबत लिंक नसेल तर लवकरात लवकर हे काम करून घ्यावे लागणार आहे. अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत.