Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेचे अर्ज सादर करण्यासाठी सध्या महाराष्ट्रात महिलांची मोठी धावपळ पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत दीड कोटीहून अधिक महिलांनी यासाठी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे महिला अर्जदारांची ही संख्या आणखी वाढणार आहे. कारण की अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत आहे. मात्र असे असले तरी अर्ज केलेल्या सर्वच महिलांना याचा लाभ मिळणार नाही. यामुळे प्रत्यक्षात लाभार्थ्यांची संख्या दीड कोटींच्या घरात राहील असा एक अंदाज आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. याचा लाभ, विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना दिला जाणार आहे. फक्त महाराष्ट्रातील महिला यासाठी पात्र ठरणार आहेत. परंतु ज्या महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे आणि महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिला देखील यासाठी पात्र ठरणार आहेत.
वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरतील. 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून पैसे मिळणार आहेत. विशेष म्हणजे याचा रोख लाभ हा रक्षाबंधनाच्या आधीच महिलांना दिला जाणार आहे. म्हणजे रक्षाबंधनाच्या आधीच महिलांना या योजनेचे पैसे मिळणार आहेत.
19 ऑगस्टपर्यंत या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यावर जमा होतील असा दावा सरकारकडून केला जात आहे. निश्चितच सरकारने रक्षाबंधनाच्या आधीच या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा केले तर लाडक्या बहिणींचा सण गोड होणार आहे. महिलांसाठी सरकारकडून ही रक्षाबंधनाची एक मोठी भेट राहणार आहे.
मात्र, या योजनेचा लाभ हा अर्ज केला म्हणून सर्वच महिलांना मिळणार नाही. काही महिलांना या योजनेसाठी अर्ज केला असेल तरीदेखील लाभ मिळणार नाही म्हणजेच त्यांचा अर्ज रद्द केला जाणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ? यासंदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या महिलांना अर्ज केला तरी लाभ मिळणार नाही ?
1) कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त असणाऱ्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र राहणार आहेत.
2) अन्य शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही. सरकारने सांगितल्याप्रमाणे ज्या महिलांना शासकीय योजनांच्या माध्यमातून आधीच पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीचा लाभ मिळत असेल तर त्यांना याचा लाभ मिळणार आहे. पण अन्य शासकीय योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपयांपेक्षा कमी लाभ मिळत असेल तर लाडकी बहीण योजनेसाठी अशा महिला पात्र ठरणार आहेत. अर्थातच संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र महिला यासाठी अपात्र राहणार आहेत.
3) 21 वर्षांपेक्षा कमी आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील.
4) महाराष्ट्र राज्याबाहेरील महिलांना याचा लाभ मिळणार नाही. पण जर संबंधित महिलेने महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल तर त्यांना याचा लाभ मिळू शकणार आहे.
5) ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन असेल तर अशा कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरणार आहेत.
6) सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना तसेच कुटुंबात कोणी शासकीय सेवेत कार्यरत असेल तर अशा कुटुंबातील महिलेला याचा लाभ मिळणार नाही.
7) कुटुंबात जर एखाद्या सदस्याला निवृत्तीवेतनाचा म्हणजेच पेन्शनचा लाभ मिळत असेल तर अशा महिला देखील या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत.
8) आयकर भरणाऱ्या कुटुंबातील महिला देखील लाडक्या बहिणीसाठी अपात्र ठरणार आहेत.
9) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहेत अशा महिलांना याचा लाभ मिळणार नाही.
10) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड / कॉर्पोरेशन / बोर्ड / उपक्रमाचे अध्यक्ष / उपाध्यक्ष / संचालक / सदस्य आहेत अशा महिला देखील यासाठी अपात्र ठरणार आहेत.