Ladki Bahin Yojana : मकर संक्रांतीच्या आधीच लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे लाडकी बहिण योजनेसाठी पात्र महिलांना आता 2100 रुपये नाहीतर थेट तीन हजार रुपये देण्याची योजना सरकारने आखली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्यात पुन्हा आमचे सरकार आले तर आम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ असे म्हटले गेले होते.
यामुळे आता महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आले असल्याने लाडक्या बहिणींच्या माध्यमातून आम्हाला 2100 रुपये कधीपासून मिळणार असा सवाल उपस्थित केला जातोय.
याबाबत राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात आम्ही यासंदर्भात विचार करणार आहोत असे म्हटले आहे. म्हणजेच अर्थसंकल्पातचं लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबतचा विचार होणार आहे. मात्र या आधी सरकार लाडक्या बहिणींना एक मोठी भेट देणार आहे.
ती म्हणजे लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे सोबतच दिले जाण्याची शक्यता आहे. डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे पंधराशे रुपयांप्रमाणे एकूण तीन हजार रुपये मकर संक्रांतीच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
14 जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि या मकर संक्रांतीचा सण लक्षात घेता डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे पैसे एकाच वेळी खात्यात जमा होण्याची शक्यता काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
तथापि या संदर्भात सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही. यामुळे फडणवीस सरकार खरच या संदर्भात सकारात्मक निर्णय घेणार का? डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकाच वेळी पात्र महिलांच्या खात्यात जमा करणार का ही गोष्ट पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
कशी आहे लाडकी बहीण योजना?
शिंदे सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. या योजनेचा लाभ जुलै 2024 पासून दिला जात आहे. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळतोय. याचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिलांना मिळतोय. ज्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळता चारचाकी वाहन नाही अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ दिला जातोय.
सध्या कुटुंबातील दोन महिलांना याचा लाभ मिळतोय. सरकारी कर्मचारी असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळत नाही. आमदार, खासदार तसेच इतर संवैधानिक पदावर कार्यरत असणाऱ्या लोकांच्या कुटुंबातील महिलांना सुद्धा याचा लाभ मिळत नाही.