Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अलीकडेच सुरू झालेली शिंदे सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. ज्या महिलांनी सप्टेंबर च्या आधीच अर्ज केले होते त्या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट अन सप्टेंबर या 3 महिन्यांचे पैसे जमा करण्यात आले आहेत.
मात्र ज्यांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला होता त्या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे देण्यात आले आहेत. अशातच, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या योजनेसंदर्भात नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे.
अजितदादांनी या योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे 10 ऑक्टोबर पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जाणार अशी घोषणा केली होती.
भाऊबीज म्हणून राज्यातील पात्र महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये ओवाळणी म्हणून दिले जातील हा अजित दादांचा वादा आहे अशी घोषणा मराठवाड्यातील एका जाहीर सभेत अजितदादांनी केली होती.
महत्त्वाचे म्हणजे 10 ऑक्टोबर पर्यंत हा पैसा पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल असेही अजित दादांनी स्पष्ट केले होते. अशातच आता या योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ लागले आहेत.
या योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रित पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याने सध्या राज्यातील पात्र महिलांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान पाहायला मिळतय. आज पासून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या संपूर्ण देशात नवरात्रोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. यानंतर विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा सण साजरा होणार आहे. अशा परिस्थितीत, जर या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे चौथ्या आणि पाचव्या हफ्त्याचे पैसे जमा झालेत तर त्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.