Ladki Bahin Yojana News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच सहावा हप्ता मिळणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले आहे.
तर दुसरीकडे या योजनेच्या पात्र महिलांना तीन हजार रुपयांचा लाभ मिळू शकतो अशा बातम्या सध्या प्रसार माध्यमांमध्ये झळकत आहेत. खरेतर, या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.
जुलै महिन्यापासून याचा लाभ मिळत असून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता या योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याचे वेध लागले आहे.
दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर म्हणजेच मार्च 2025 मध्ये सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देण्याबाबतचा निर्णय होऊ शकतो असे संकेत दिले आहेत.
तत्पूर्वी आता लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणींना आता चक्क तीन हजार रुपयांचा लाभ दिला जाईल असे म्हटले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे सोबतच दिले जाण्याची शक्यता आहे.
जानेवारीमध्ये मकर संक्रांतीचा सण येणार असून याच मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी दिले जाऊ शकतात. ऑक्टोबर महिन्यात सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले होते.
दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता सरकारने त्यावेळी हा निर्णय घेतला होता. दरम्यान आता मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सरकार असाच निर्णय घेऊ शकते. डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी पात्र महिलांच्या खात्यात जमा करू शकते असा दावा केला जात आहे.
परंतु याबाबतची अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. यामुळे डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी पात्र महिलांना मिळणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन संपले की लगेचच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार असे स्पष्ट संकेत दिलेले आहेत.
यामुळे डिसेंबर महिन्यातच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळू शकणार आहे. यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासोबतच जानेवारी महिन्याचे सुद्धा पैसे मिळणार का ? ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे.