Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. शिंदे सरकारने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.
ही योजना जुलै महिन्यापासून सुरू झाली असून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा सुद्धा झाले आहेत. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्याचे पैसे ॲडव्हान्स मध्ये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
अर्थातच लाडकी बहीण अंतर्गत पात्र महिलांना आत्तापर्यंत 7500 रुपयांचा लाभ मिळाला आहे. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखी एक नवीन योजना सुरू होणार आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना पार्ट टाइम रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार असून यासाठी त्यांना 11 हजार रुपयांचे मानधन सुद्धा मिळणार आहे. फक्त चार तास काम आणि अकरा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
खरंतर शिंदे फडणवीस पवार सरकारने राज्यातील सर्वसामान्य गरजवंत महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. या अंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये म्हणजेच एका वर्षात 18000 रुपये दिले जाणार आहेत. म्हणून ही योजना महिलावर्गात चांगलीच लोकप्रिय झालेली दिसत आहे.
पण, या योजनेतून महिलांना रोजगार मिळत नाही, महिलांना रोजगार उपलब्ध करून द्या, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. अशातच आता राज्य सरकारने यावर देखील नवीन योजना आणायचा निर्णय घेतला असल्याची माहिती सरकारमधील मंत्र्यांनी दिली आहे.
महिलांना थेट टाटा कंपनीत नोकरी देण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. चार तासांच्या या पार्ट टाइम जॉब म्हणजे अर्ध वेळ नोकरीसाठी महिलांना 11 हजार रुपयांचे मानधन सुद्धा देण्यात येणार आहे.
यासोबतच एक वेळचा नाश्ता आणि जेवण देखील महिलांना दिलं जाणार आहे. यासंदर्भातील माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यामुळे गरजू महिलांना या योजनेचा मोठा फायदा होणार असे मत जाणकार लोकांकडून व्यक्त केले जात आहे.
नक्कीच महिलांना जर पार्ट टाइम जॉब उपलब्ध झाला तर यामुळे राज्यातील लाखो महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहेत. घरातील काम करून त्यांना नोकरी करता येईल यामुळे सर्वच गरजू महिला नोकरी करतील आणि परिणामी राज्याच्या अर्थव्यवस्थेला देखील बूस्टर मिळणार आहे.