Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेचा तिसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात कधी जमा होणार यासंदर्भात सरकारकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. खरे तर लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने अलीकडेच जाहीर केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे.
मध्यप्रदेश राज्यात लाडली बहना योजना सुरू आहे आणि याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. मध्यप्रदेश मध्ये सुरू असलेल्या योजनेअंतर्गत तेथील महिलांना दरमहा 1250 रुपये दिले जात आहेत.
मात्र महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. अर्थातच या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना दरवर्षी 18 हजार रुपये दिले जाणार आहेत.
या योजनेसाठी राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र ठरणार आहेत. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे मिळालेले आहेत. एवढेच नाही तर सरकारने या योजनेचा तिसरा हफ्ता 29 सप्टेंबरला पात्र महिलांच्या खात्यात जमा करणार असल्याचे जाहीर केले आहे.
यामुळे या योजनेच्या पात्र महिला 29 तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत. खरंतर या योजनेचा पैसा हा 29 तारखेपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे मात्र तत्पूर्वी सरकारने या योजनेचे पैसे हे बँकेत आज अर्थातच 25 सप्टेंबर 2024 ला जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाचे म्हणजे बँकेकडे हे पैसे आल्यानंतर बँकेच्या माध्यमातून हे पैसे आजपासूनच हळूहळू पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेअंतर्गत ट्रान्सफर केले जाणार आहेत.
म्हणजेच महिलांना आजपासूनच आपले बँक अकाउंट चेक करावे लागणार आहे. खरंतर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे 29 सप्टेंबरला रायगड येथे आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.
तत्पूर्वी आज या योजनेचे पैसे बँकेकडे वर्ग करण्यात आले असून बँकांच्या माध्यमातून आता हे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या माध्यमातून थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात जमा होतील.
तिसऱ्या हप्त्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटीनिमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर जे अर्ज 24 ऑगस्टनंतर छाननी करून झाले आहेत. आणि सप्टेंबर महिन्यात 20 ते 25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील त्यांनी लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभ वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळाले आहेत त्यांना आणि ज्यांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे अशा महिलांना आता पंधराशे रुपये मिळणार आहेत. मात्र ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधी अर्ज केला आहे आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत मात्र ज्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळालेले नाहीत अशा महिलांना 4500 रुपये मिळणार आहेत.