Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहिण योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ही योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. ही योजना जुलै महिन्यापासून सुरू करण्यात आली असून याचा लाभ ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्षात पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.
या अंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना लाभ दिला जातोय. विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या अन निराधार महिलांना या अंतर्गत लाभ मिळतोय. कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील याच्या लाभासाठी पात्र ठरते. या योजनेसाठी राज्यातील जवळपास दोन कोटी महिला पात्र ठरल्या आहेत. गरजवंत सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना या योजनेचा मोठा दिलासा मिळतोय.
महत्त्वाचे म्हणजे सरकार या योजनेचे कौतुक राजकारणासहित समाजकारणातील अनेक लोकांनी केले आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना देखील या योजनेची भुरळ पडली आहे हे विशेष. आतापर्यंत या योजनेचे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले आहेत. नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात ॲडव्हान्स मध्ये जमा करण्यात आले आहेत. दिवाळी सणाचे औचित्य साधून शिंदे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
यामुळे ही योजना सध्या राज्यातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय बनली आहे. या योजनेचा नक्कीच महायुती सरकारला फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र काही लोक जाणूनबुजून या योजनेबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. या योजनेची बदनामी करण्याचे षडयंत्र काही लोकांकडून सुरू आहे. सुरुवातीला या योजनेला जुमला म्हटले, मात्र महिलांचा सरकारवर विश्वास होता. म्हणून जुमला म्हटले तरीही महिलांनी मोठ्या प्रमाणात या योजनेत नाव नोंदणी केली.
पुढे या योजनेवरून राज्याच्या आर्थिक स्थितीवर टिप्पणी केली. पुढे तर काही लोकांच्या माध्यमातून या योजनेला राज्याच्या वित्त विभागाने विरोध दाखवला असल्याच्या बातम्या पेरल्या गेल्यात. या बातम्या मुद्दामहून पेरल्या गेल्या. मात्र सरकारने या योजनेसाठी 46000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. म्हणजेच या योजनेसाठी पुढील पाच वर्ष पैशांचे टेन्शन नाही. पुढे विरोधकांनी नैतिकतेचा प्रश्न उपस्थित केला.
या योजनेअंतर्गत पैसे देऊन महायुती सरकार महिलांची मते विकत घेत असल्याचे भासवण्यात आले. मध्यंतरी या योजनेच्या विरोधातील काही व्हिडिओज व्हायरल झालेत. काही लोकांनी हे व्हिडिओचं काही महिलांना हाताशी घेऊन बनवले होते. यामध्ये काही महिला आम्हाला पैसे नकोत पण गॅस सिलेंडर स्वस्त करा असे बोलताना दिसत होत्या. मात्र हे व्हिडिओज बनवण्यात आले होते. प्रत्यक्षात या योजनेचा महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असून महिला वर्गाकडून सरकारचे कौतुक केले जात आहे.
ही योजना दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. या योजनेची धास्ती विरोधकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की, मध्यंतरी या योजनेसाठी चे फॉर्म काही लोकांकडून चुकीच्या पद्धतीने भरण्यात आले. यामुळे महिलांना याचा लाभ मिळणार नाही आणि सरकारची किरकिरी होणार असे त्यांना वाटतं होते. एवढेच नाही तर या योजनेसाठी सुरू करण्यात आलेल्या संकेतस्थळावर देखील जंक डाटा टाकून हे संकेतस्थळ स्लो करण्याचा प्रयत्न झाला.
मात्र या साऱ्या अडचणींवर मात करत राज्यातील दोन कोटी महिलांना या योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळालाच. मात्र विरोधकांकडून आता ही योजना बंद झाली असल्याचे म्हटले जात आहे. खरे तर सध्या महाराष्ट्रात आचारसंहिता सुरू आहे आणि आचारसंहिता काळात आर्थिक लाभाच्या अनेक योजना बंद कराव्या लागतात. यानुसार लाडकी बहीण योजना देखील तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे.
पण आम्ही आपणास सांगू इच्छितो की नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे ऑलरेडीच पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांना देताना आचारसंहितेची अडचण झाली असती आणि यामुळेच शिंदे सरकारने महिलांचे हित लक्षात घेऊन नोव्हेंबर महिन्याचे पैसे आधीच त्यांच्या खात्यात वळते केलेत. दरम्यान सध्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेला तात्पुरती स्थगिती मिळाली असल्याने काही लोकांकडून ही योजना कायमची बंद झाली असल्याचा आरोप होत आहे.
पण सरकारने ही योजना बंद झालेली नसून भविष्यातही बंद पडणार नाही अशी ग्वाही दिली आहे. यामुळे लाडकी बहीण योजना ही येत्या निवडणुकीत गेम चेंजर ठरणार असे दिसते. लाडकी बहीण योजनेकडेच महाराष्ट्राच्या सत्ताकारणाच्या चाव्या आहेत. लाडक्या बहिणी ज्यांना आपले बळ देतील तेच सरकार आगामी काळात राज्यात शासन करणार आहे. सध्या स्थितीला मात्र लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकार फ्रंटफूटवर आले आहे. यामुळे लाडक्या बहिणी महायुती सरकारला सत्तेच्या चाव्या देणार की महा विकास आघाडीला हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.